डोंबिवली स्थानकातील 'तो' पूल लवकरच पूर्ण होणार

daombivali bridge
daombivali bridge
Updated on

डोंबिवली : लॉकडाऊनमुळे घरातच अडकलेल्या डोंबिवलीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. दिर्घ कालावधीसाठी बंद असलेला डोंबिवली स्थानकातील पादचारी पूल जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन सुरु होण्याच्या सुमारास या पूलाचे काम सुरु झाले होते. आता कोणतीही वाहतूक नसल्याने तो काही आठवड्यात पूर्ण होण्याची आशा आहे. 

डोंबिवलीतील हा पूल धोकादायक जाहीर केल्यानंतर तो पाडण्यासाठीही वेळ लागला होता. लॉकडाऊनपूर्वी म्हणजेच 17 मार्चला चार तासाचा ब्लॉक घेऊन त्याचे काम सुरु झाले. त्यावेळी पूलाची कमान वसवण्यात आली होती. आठ गर्डर असलेल्या पूलाच्या दोन कमानी  वसवण्याचे काम 17 मे रोजी पूर्ण झाले. आता अखेरची कमान बसवण्याचे काम 27 मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पूलाची अन्य कामे सुरु होतील. 

मध्य आणि पश्चिम रेल्वेने लॉकडाऊनचा फायदा घेत अन्य पूलांच्या कामासही वेग दिला आहे. चार तासांचा किमान ब्लॉक आवश्यक असलेल्या दादरच्या पूलाचेही काम सुरु झाले आहे. मालाडच्या विरार दिशेकडे असलेल्या पूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर चर्चगेटच्या दिशेला असलेल्या पूलाच्या कामास वेग आला आहे. लोअर परळच्या विरार दिशेकडे असलेला जुना दगडी पूल हटवण्याचे काम झाले आहे. तसेच रस्त्याच्या पूलाचे कामही वेगाने सुरु आहे. वांद्रे स्थानकाच्या मध्यास असलेल्या पूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर वांद्रे टर्मिनसवर चर्चगेटच्या दिशेने असलेल्या पूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

bridge at Dombivli station will be completed soon, read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com