अप्रतिम ! लॉकडाऊनमध्ये जोपासला अनोखा छंद, पक्षांच्या पिसांवर कोरलेली कलाकृती थक्क करणारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

लॉकडाउनच्या दिवसांत नीलेश चौहान यांनी जोपासला अनोखा छंद

मुंबई, प्रभादेवी - चित्रांचे पोर्ट्रेट साकारणारे कलाकार आजवर अनेकजण पाहिले मात्र चक्क पाळीव पक्षांच्या गळलेल्या पिसांवर विविध पोर्ट्रेट कोरून साकारलेली कलाकृती थक्क करणारी अशीच आहे.

गेल्या महिन्याभरापासून लॉकडाउनमुळे सर्वजण घरात काहीनाकाही कामात व्यस्त राहून वेळ घालवतायत. मात्र या लॉकडाउनच्या दिवसांत आपल्या हस्तकौशल्येतून पाळीव पक्षांच्या गळलेल्या पिसांवर कोरीव काम करत नीलेश चौहान या कलाकाराने विविध कलाकृती साकारल्या आहेत.

आधी तुमच्याशी गोड गोड बोलतात, मग हळूच घाबरवतात, एकदा तुम्ही घाबरलात की...

ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहेत आशांकडून या पक्षांची गळून पडलेली पिसं मागवून ती जमा केली आणि अशा वेगवेगळ्या पक्षांच्या रंगीबेरंगी पिसांवर कोरीव काम करून या लॉकडाउनच्या दिवसांत आपण ही कला जोपासण्यात मग्न असल्याचे नीलेश यांनी सांगितले.

आफ्रिकन पोपट, अमेरिकन पोपट, बदक, मोर अशा पाळीव पक्षांच्या शेपटाकडील गळलेल्या पिसांवर कोरीव काम करून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट, सचिन तेंडुलकरचे स्केच, साई बाबांचे पोर्ट्रेट उंट, वाघ, विविध पक्षांचे थवे, ड्रॅगन, अशा विविध कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत.

कचरा वर्गीकरणाची व्याख्या बददली, आता 'या' पद्धतीने करायचं कचऱ्याचं वर्गीकरण, नाहीतर...

कलाकृतीनुसार त्या त्या पिसांची निवड केली जाते. जर एखाद्या कलाकृतीची ब्लॅक शेड दाखवायची असेल तर काळ्या रंगाचे पीस वापरण्यात येते. लाल मुंग्यांचा थवा कोरायचा असेल तर स्कारलेट मकाऊ पक्षाच्या शेपटी कडील पीस वापरले जाते, असं नीलेश यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या बुद्धपौर्णिमेला स्कारलेट मकाऊ या पोपट जातीतील पक्षाचे पीस घेऊन त्यावर कोरीव काम करत त्याला आकार देत गौतम बुद्धाची अप्रतिम अशी प्रतिमा त्यांनी साकारली होती.

nilesh chauhan spend his quality time preparing feather art


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh chauhan spend his quality time preparing feather art