गुड न्यूज आली,  कोरोना संक्रमित मातांकडून 203 सुखरूप बाळांचा जन्म

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

कोरोनाचा कहर सर्वत्र पसरत असतांना या आजाराने गरोदर महिलांनाही आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या अनेक गरोदर महिलांना खासगी प्रस्तुती गृहांनी दाखल करून घेण्यास नकार देत असल्याने या महिलांसमोर मोठी अडचण निर्माण होते

मुंबईत, ता. 19 : कोरोनाचा कहर सर्वत्र पसरत असतांना या आजाराने गरोदर महिलांनाही आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या अनेक गरोदर महिलांना खासगी प्रस्तुती गृहांनी दाखल करून घेण्यास नकार देत असल्याने या महिलांसमोर मोठी अडचण निर्माण होते. अशा महिलांना पालिकेची रुग्णालये साथ देत आहेत.  संसर्ग झालेल्या तब्बल 203 जणींची पालिकेच्या सायन आणि नायर रुग्णालयाने सुखरूप सुटका केली. माता कोरोनाबाधित असूनही नायर आणि सायन रुग्णालयाच्या दक्षतेमुळे बाळांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे मातांसह या नवजात बाळांना देखील एकप्रकारे नव जीवन प्राप्त झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

कोरोना संसर्गाने अवघे जग धास्तावले असतांना सायन रूग्णालयात 100 व्या कोरोना संक्रमित मातेने सुदृढ आणि निरोगी बाळाला जन्म दिला. तर अश्याच प्रकारे नायर रुग्णालयात ही 103 कोरोना बाधित गरोदर महिलांचे यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर सर्वत्र पसरला असतांना या दोन रुग्णालयात आतापर्यंत 203 संक्रमित मातांनी निरोगी बाळांना सुखरूप जन्म दिला. यातील आनंदाची गोष्ट म्हणजे या महिलांची योग्य काळजी घेतल्याने व समुपदेशन केल्याने बाळांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले नसल्याचे समोर आले आहे. 

कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्यात प्रसूतीची वेळ जवळ आलेली असताना, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या गर्भवती महिलेसह कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकते. त्यानंतर नाव नोंदणी केलेल्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याने त्यांची भीती आणखीन वाढते. त्यानंतर अन्य रुग्णालयात जाऊन मदत मागितली जाते. मात्र पदरी निराशाच पडते. अखेर पालिकेच्या रुग्णालयांचा आधार घेतला जातो.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, गोवंडी, मानखूर्द भागातील अधिकेतर गरोदर महिला सायन रूग्णालयात दाखल होत्या. सायन रूग्णालयाच्या प्रसूती विभागात गेल्या महिन्याभरात 103 कोरोनाबाधित महिलांची यशस्वी बाळंतपण केली गेली. यात 55 सिझेरींग आणि अन्य नॉर्मल बाळंतपण करण्यात आली. त्यात 102 नवजात बालकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले होते. तर या बाळांमधील एकाला काही प्रमाणात बाधा होती. नायरमध्येही 100 कोरोना बाधित महिलांची यशस्वी प्रसूती झाली आहे.

कचरा वर्गीकरणाची व्याख्या बददली, आता 'या' पद्धतीने करायचं कचऱ्याचं वर्गीकरण, नाहीतर...

त्यात 24 सिझरींग तर 76 नॉर्मल बाळंतपणे झाली आहेत. असे नायर रुग्णालयातील गायनाकोलॉजी विभागातील असो. प्रोफेसर डॉ. नीरज महाजन यांनी सांगितले.  रुग्णालयाने आणि डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे बाळांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  प्रसूती झालेल्या महिलांची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही  डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी जीवावर उदार होऊन आपली भूमिका बजावत आहेत. कोरोना सारख्या संकटातही देवदुताप्रमाणे ते रुग्णांची सेवा करत आहेत. नायर आणि  सायन रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य कामगारांनी तर आपल्या कुटूंबाप्रमाणे या महिलांची काळजी घेतली आहे. 

कोरोना संसर्ग वाढत असल्याने ताण तणाव वाढत असताना प्रसूतीचे दिवस भरत आलेल्या महिलेची अवस्था कशी होत असेल याची कल्पना करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यानंतर बाळांना आईचे दूध देण्यावर भर देतो. कारण त्यामधून बाळाची इम्युनिटी वाढण्यास मदत होते - डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

आधी तुमच्याशी गोड गोड बोलतात, मग हळूच घाबरवतात, एकदा तुम्ही घाबरलात की...

रुग्णालयात मास्क अन्य सेफ्टी सोबत नर्स डॉक्टरांना  इमोशनल होण्यापासून दूर राहण्याचे ट्रेनिंग दिलेले असते. त्यामुळे आईलाही डॉक्टर नर्स आणि कर्मचारी वारंवार सूचना देतात. आईच्या गर्भात असताना बाळाला अँटीबॉडीज मिळत असल्याने बाळ सुदृढ जन्माला येत आहे. मात्र यावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. - डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय. 

corona positive cases gave birth to 203 corona negative babies


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive cases gave birth to 203 corona negative babies