esakal | "सी-लिंक"प्रमाणे रेल्वेमार्गावर पूल
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

"सी-लिंक"प्रमाणे रेल्वेमार्गावर पूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे मार्गावर (Railway) पूल बांधताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. सॅन्डहर्स्ट रोड (Sandhurst Road) येथील हॅकॉक (Hackcock) पूलही सहा वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे आता रेल्वे मार्गावर वांद्रे-वरळी (Bandra-Worli) सी-लिंकप्रमाणे (Sea-Link) केबल स्टेड पूल बांधण्याचा विचार पुढे आला आहे. दादर (Dadar) येथील लोकमान्य टिळक पुलासह दक्षिण मुंबईतील (South Mumbai) चार पूल अशा पद्धतीने बांधले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या रेल्वेमार्गावरील १४ धोकादायक पुलांची यादी जाहीर करून गणेशोत्सवावेळी पुलांवर गर्दी न करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून महापालिका हे आकरत आहे; मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. दक्षिण मुंबईतील रेल्वे मार्गावरील बहुतांश पूल हे ब्रिटिशकालीन असल्याने त्यांचे आयुष्य संपले आहे. या पुलांची रुंदी कमी असल्याने वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते.

त्यामुळे हे पूल पाडून त्या ठिकाणी नवे पूल बांधण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. या १४ पैकी चार केबल स्टेड पूल बांधण्यात येणार आहे. हे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

हेही वाचा: रेल्वेने कलव्हर्टसाठी केलेला 30 कोटींचा खर्च पाण्यात ?

७३० कोटींचा खर्च रे रोड रेल्वे मार्गावरील पूल, भायखळा येथील सीताराम सेल्वन व्हाय पूल, दादर येथील लोकमान्य टिळक पूल या तीन पुलांच्या बांधकामाचा अंदाजित खर्च ७३० कोटीपर्यंत आहे. तसेच घाटकोपर येथे रेल्वे मार्गावरील पुलाचे बांधकाम याच पद्धतीने केले जाणार आहे. भायखळा येथील एस ब्रिज आणि पादचारी पूलही बांधण्याचा विचार आहे.

loading image
go to top