मुंबई पालिकेतल्या १३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, वाचा सविस्तर

समीर सुर्वे
Saturday, 5 September 2020

पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. कोविडमुळे मुंबई महानगर पालिकेतील 132 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यातील 107 जणं हे चतुर्थी श्रेणी कर्मचारी आहेत.

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमानं घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक झालेला पाहायला मिळतोय. अशातच कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या मुंबई कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. तसंच बऱ्याच पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. कोविडमुळे मुंबई महानगर पालिकेतील 132 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यातील 107 जणं हे चतुर्थी श्रेणी कर्मचारी आहेत.

राज्य सरकारच्या नियमानुसार मृत कर्मचार्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र,आता पर्यंत फक्त 6 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ही मदत मिळाली असल्याची माहिती म्युनसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदिप नारकर यांनी दिली. योजनेतील निकषांमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळू शकली नसल्याचंही त्यांनी सांगितले. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. 

अधिक वाचाः  मुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट

महापालिकेच्या 2 हजार 588 कर्मचार्यांना कोविडची बाधा झाली. यात उपायुक्त दर्जा पासून सर्वच श्रेणीतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे तर एक उपायुक्त आणि एका सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचीही मृत्यू झाला आहे. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित काम देण्यात आले होते. 

धारावीमध्ये अन्न वाटप करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.  सहा महिन्यांत पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी कोरोनाबाधित झालेत.

हेही वाचाः  मुंबईत उन्ह्याच्या झळा; तापमान 34 अंशाजवळ, जाणून घ्या येत्या दोन दिवसात कसं असेल तापमान

महापालिकेचे कर्मचारी स्वतः चा जीव धोक्यात घालून प्रतिबंधित क्षेत्रासह अनेक भागात कोविड बाबत कामे करत आहे. गरजूंना अर्ज पुरविणे, कोविड केंद्राचे व्यवस्थापन अशी अनेक प्रकारची कामे करत आहे. कोविडची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Brihanmumbai Municipal Corporation 132 employees die due covid 19


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brihanmumbai Municipal Corporation 132 employees die due covid 19