

BMC Engineers Transfer
ESakal
मुंबई : पालिकेत वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व अभियंत्यांची आता उचलबांगडी होणार आहे. पालिकेच्या पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे प्रशासनात मोठे फेरबदल होणार असून, येत्या महिन्याभरात जवळपास ८०० अभियंत्यांच्या बदल्या होणार आहेत. या प्रक्रियेमुळे नवीन लोकांच्या नियुक्तीला होणारा विरोध मोडून काढला जाणार असून, मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.