shivsena congress
shivsena congresssakal

मुंबई पालिकेत शिवसेना-काँग्रेस एकत्र?

राहुल गांधी यांची खासदार संजय राऊत पुन्हा भेट घेणार

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा करण्यास शिवसेना (shivsena) आणि काँग्रेस (congres) तयार झाले आहेत. मुंबई महापालिकेत (BMC) सेना-काँग्रेस एकत्र येऊ शकेल काय, आल्यास मतदार बेरजेच्या राजकारणाचा प्रत्यय देतील काय, यावर आगामी भेटीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी शिवसेना खासदार संजय राऊत चर्चा करणार आहेत. (Brihanmumbai Municipal Corporation congress shivsena together)

मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची असून महाविकास आघाडी सर्व निवडणुका एकत्र लढेल, असा मनसुबा यापूर्वी जाहीर करण्यात आला होत, मात्र गेल्या काही महिन्यात मुंबईत तसेच अन्यत्र काँग्रेसने स्वबळाच्या भाषेचा वापर केला आहे; मात्र भाजपने मुंबईतील आपल्या आव्हानास ललकारण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेससमवेत असणे फायद्याचे ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांना वाटते. सन २०१७ साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेने ३७ टक्के मते घेत ८४, तर भाजपने ३६.१ टक्के मते घेत ८२ जागा जिंकल्या होत्या.

त्या निवडणुकीत काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यांच्या मतांची टक्केवारी १३.७ टक्के इतकी होती. सेनेला मिळणारी हक्काची मराठी मते काँग्रेसच्या उत्तर भारतीय तसेच मुस्लिम समाजातील मतांची बेगमी मिळवू शकली तर हे समीकरण विजयी असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेला खात्रीचा वाटत असल्याचे बोलले जाते. मुंबईतले पक्षाचे हे बळ लक्षात घेता शिवसेनेशी युती करण्यास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप फारसे अनुकूल नसून स्वबळावर लढल्याने पक्षाची वाढ होते, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. मात्र भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याचे ठरले तसेच मुंबईतही महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्र लढायचे काय यावर विचार सुरू आहे.

shivsena congress
व्वा पठ्ठ्या! रविनं प्रतिस्पर्ध्याला दाखवलं आस्मान; आणखी एक पदक निश्चित

पुढील भेटीत तपशीलवार चर्चा

दिल्लीत सोमवारी (ता. २) झालेल्या भेटीत मुंबई पालिका निवडणुकीच्या विषयावर थोडे बोलणे झाल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सकाळ’शी बोलताना मान्य केले. पुढच्या भेटीत यासंबंधी तपशीलवार चर्चा होईल, असे संकेतही त्यांनी दिले. राहुल गांधींनी या भेटीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेतल्याचे राऊत यांनी माध्यमांना सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com