३ तारखेनंतर मुंबईला रुळावर आणण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'मोठा' निर्णय; दिलेत 'हे' आदेश...

३ तारखेनंतर मुंबईला रुळावर आणण्यासाठी मुंबई महापालिकेचा 'मोठा' निर्णय; दिलेत 'हे' आदेश...

मुंबई - मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. कोरोनाच्या संवेदनशील काळात जागतिक शहराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर. मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळला, मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने मुंबईतील कोरोना रुग्णाची संख्या हळूहळू वाढत गेली. याच पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यात आली. आधी पन्नास टक्के, त्यानंतर २५ आणि त्यानंतर ५ टक्के अशी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावयास सांगण्यात आलं होतं.

आता येत्या ३ तारखेला नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला दुसरा लॉक डाऊन संपतोय. याच पार्श्वभूमीवर आता हळूहळू गोष्टी पूर्वपदावर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. तसं सूतोवाच देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून म्हणजेच ४ तारखेपासून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे संकेत दिले आहेत.  

मुंबई बाहेर राहणाऱ्या  कर्मचाऱ्यांचं काय ? 

मुंबई महापालिकेतील अनेक कर्मचारी हे मुंबई बाहेरील आहेत. अशात मुंबईतील लाईफ लाईन म्हणजेच मुंबईच्या ट्रेन्स बंद आहेत. अशात मोठ्या प्रमाणात ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागातून हे कर्मचारी मुंबईत येत असतात. अशात अशा मुंबई उपनगरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराजवळच्या वॉर्ड ऑफिसमध्ये रुजू झालं तरी चालणार आहे.

वय वर्ष ५५ आणि त्यापुढील कराचार्यांचं काय ? 
ज्यांचं वय ५५ किंवा पुढे आहे अशा आणि ज्यांना मधुमेह, ब्लडप्रेशर किंवा इतर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी घरूनच काम केलं तारीही चालणार आहे. मुंबई महापालिकेतील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी देखील हा नियम लागू होतो. 

Brihanmumbai Municipal Corporation has mandated 100 percent attendance for all its employee

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com