esakal | ३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...
sakal

बोलून बातमी शोधा

३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...

मुंबई, पुणे, नागपूर या रेड झोनमध्ये आता काही करणं हिताचं नाही. ऑरेंज झोनमध्ये काय करू शकतो याचा विचार सध्या केला जातोय

३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. हे विषाणू सोबतचं युद्ध आपण जिंकणारच आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तुमची साथ अशीच असू द्या असं उद्धव ठाकरे म्हणालेत. लॉक डाऊन म्हणजे सगळं थांबलं असं नाही तर हा एक गतिरोधक आहे. विषाणूची साखळी तोडण्यासाठीचा हा गतिरोधक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रानं ठरवलं तर महाराष्ट्र काहीही करू शकतो याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. 

'या' तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार विधान परिषद आमदार...

३ मे नंतर काय ? 

३ मे रोजी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉक डाऊन संपतोय. या धर्तीवर  ३ तारखेनंतर काय?  याबाबतीत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत सूचक विधान केलंय. ३ तारखेनंतर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन पाहून अधिक मोकळीक देण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. मात्र मोकळीक दिल्यानंतर आतापर्यंतची केलेली तपश्चर्या वाया जाऊ न देता पुन्हा आपल्या आयुष्याशी गाडी रुळावर आणायची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. 

सोशल मीडियावर ट्रेंडिंग 'स्मायली' काढतेय भाजप नेत्यांना चिमटे; पण ही स्मायली आहे तरी कोण ?

मुंबई, पुणे, नागपूर या रेड झोनमध्ये आता काही करणं हिताचं नाही. ऑरेंज झोनमध्ये काय करू शकतो याचा विचार सध्या केला जातोय. ग्रीन झोनमध्ये यापूर्वीच आपण काही सवलती दिल्या असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. सध्या परराज्यात जाणाऱ्यांसाठी महाराष्ट्रात व्यवस्था केल्या जातायत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे करतोय. येत्या काळात लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर झुंबड उडाली तर पुन्हा निर्बंध लादले जातील असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत.

cm uddhav thackeray speaks to maharashtra on fb live and speak about things after 3rd may