Mumbai: महापालिकेच्या नव्या सभागृहाला मंजुरी, आझाद मैदानाशेजारी सहा मजली इमारत उभारणार; कसा असेल ४५ कोटींचा प्रकल्प?

Mumbai BMC New Council Hall: मुंबई महापालिकेसाठी आझाद मैदानाजवळ नवे सभागृह उभारले जाणार आहे. सहा मजली इमारतीच्या ४५ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
Mumbai BMC New Council Hall

Mumbai BMC New Council Hall

ESakal

Updated on: 

मुंबई : महापालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयातील अपुऱ्या पडणाऱ्या सभागृहाला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या नव्या सभागृहाच्या प्रस्तावावर अखेर स्थायी समितीने मोहर उमटवली. आझाद मैदानाशेजारी सहा मजली इमारत उभारण्यात येणार असून, त्यामध्ये तब्बल ३३९ नगरसेवकांच्या बैठकीची व्यवस्था असेल. सुमारे ४४ कोटी ८७ लाख २८ हजार ८८७ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीने गुरुवारी सर्वानुमते मंजुरी दिली. येत्या दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

Loading content, please wait...