Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार
Mumbai Elphinstone Bridge: मुंबईतील ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा झाला आहे. या पुलाचे शेवटचे गर्डर काढून टाकण्यात आले असून येथे आता नवीन दुवा लवकरच आकारा घेणार आहे.
मुंबई : मध्य मुंबईतील सध्याच्या परळ आणि प्रभादेवी या भागांदरम्यान गेल्या ११३ वर्षांपासून प्रवाशांच्या वाहतुकीला दिशा देणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल रविवारी इतिहासजमा झाला. कामगारांनी या पुलाचे शेवटचे गर्डर काढून टाकले.