22 कोटींची फसवणूक करणाऱ्या ब्रोकरला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - वॉर्डन रोड येथील कुटुंबाच्या नावावरील 22 कोटी 80 लाखांच्या शेअर्सचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी एका ब्रोकरला अटक केली. आरोपीने या कुटुंबाच्या नावाची पॉवर ऑफ ऍटर्नी तयार करून शेअर्स बॅंकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

अजय मोदी असे त्याचे नाव आहे. तो भुलाभाई देसाई रोड येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात फसवणूक व बनावटीकरण केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार राजूल पटेल व त्यांची आई निर्मल कपाडिया यांच्याकडे सिमेन्स कंपनीचे शेअर्स होते. त्यांनी ते शेअर्स या ब्रोकरकडे ठेवले होते. पटेल व त्यांच्या आईला या शेअर्सचा डिव्हिडंट मिळत होता. 2008 मध्ये तो येणे बंद झाला. त्या वेळी त्यांनी चौकशी केली असता, संबंधित शेअर्स त्यांच्या नावावर नसून ते हस्तांतरित झाल्याचे समजले. त्या वेळी मोदीने ते शेअर्स बनावट कागदपत्रांच्या साह्याने खासगी बॅंकेत गहाण ठेवून त्याचे कर्ज घेतले. ते कर्ज न फेडल्यामुळे बॅंकेने त्या शेअर्सचा लिलाव केला. त्यानंतर मोदीने शेअर्सचे पैसे देण्याचे आश्‍वासन या कुटुंबाला दिले होते. त्याने पैसे न दिल्यामुळे अखेर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी मोदीला अटक करण्यात आली.

Web Title: broker arrested in cheating crime

टॅग्स