क्रुर हत्याकांडाने विरार हादरले; ब्लेडच्या तुकड्यावरून छडा

क्रुर हत्याकांडाने विरार हादरले; ब्लेडच्या तुकड्यावरून छडा

नालासोपारा - बंद खोलीत ब्लेडचा तुकडा आढळल्यानंतर अवघ्या १२ तासांत विरारमधील हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. केवळ ६० हजारांसाठी मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे शौचालयाच्या टाकीत टाकण्यात आले होते. तर काही अवयव रेल्वेतून फेकून दिल्याचे तपासात उघड झाले. गणेश कोटलकर असे हत्या झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तर पिंटू शर्मा असे आरोपीचे नाव आहे.

विरारमधील हत्याकांडाने अवघा परिसर हादरला होता. मांसाचे तुकडे गोळा करताना पोलिसही हैराण झाले होते. विरार पश्‍चिम ग्लोबल सिटी परिसरातील बचराज पॅराडाईज या इमारतीच्या शौचालयाच्या टाकीमधून मंगळवारी मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बचराज पॅराडाईज याच इमारतीतील सी विंगमधील ६०२ या रूममध्ये पोलिसांना संशयास्पद ब्लेडचा तुकडा सापडला होता, याच तुकड्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. 

पोलिसांनी खोली तपासल्याचे लक्षात आल्यावर येथे आलेल्या शर्माच्या हालचालीत बदल झाला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याची चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली, असे पोलिस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

६० हजारांसाठी काढला मित्राचा काटा
मृत गणेश कोटलकर मिरा रोडमधील रहिवासी होते. त्यांचा छपाईचा व्यवसाय होता. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांची विवाहाची तयारी सुरू होती. पिंटू शर्मा (४५) याच्यासोबत गणेशची वर्षभरापूर्वी मैत्री झाली होती. शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करणाऱ्या वाकोला येथील पिंटूकडून गणेश यांनी सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये घेतले होते. त्यापैकी ६० हजार परत करण्यास टाळाटाळ केल्याने पिंटूने गणेश यांची हत्या केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com