सर्वांना परवडणारी घरे उभी करा : एकनाथ शिंदे 

कल्याण : प्रदर्शनात दीपप्रज्वलन करताना मंत्री एकनाथ शिंदे व इतर (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)
कल्याण : प्रदर्शनात दीपप्रज्वलन करताना मंत्री एकनाथ शिंदे व इतर (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)

कल्याण : सर्वसामान्य नागरिकांना वारंवार घर घेता येत नाही. त्यांना परवडणारे घरे उभी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन प्रकल्प उभे करावे. काही सूचना असेल तर राज्य सरकारस्तरावर धोरण ठरवू. सरकार, पालिका जेव्हा सवलत देईल तेव्हा ग्राहकांनाही फायदा होईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

सीआरईडीएआय (एमसीएचआय) कल्याण-डोंबिवली युनिटच्या माध्यमातून कल्याण येथील फडके मैदानात गुरुवारपासून (ता.23) 9 व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे रवि पाटील, दीपक मेहता, मिलिंद चव्हाण, अरविंद वरक, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. 

मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बांधकाम क्षेत्र सध्या अडचणीत आहे. जेवढा मोठा प्रकल्प तेवढा जास्त त्रास होतो. बांधकाम व्यवसायावर 150 ते 200 छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून असून त्यांच्या अडचणी दूर करू, असे आश्‍वासन शिंदे यांनी दिले. राज्यात परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उभे करणे गरजेचे असून त्यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घ्यावा. परवडणारे घर सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी अशी घरे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध कामे शहरात सुरू असून, लवकरच वाहतूक कोडी तसेच इतर समस्या दूर होतील. ठाणे जिल्ह्यातील दळणवळण मजबूत करण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करत असून त्यामुळे वाहतूक कोंडीचे विघ्न दूर होईल. ज्या पुलांची कामे रखडली आहेत, ती लवकरच मार्गी लागतील, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com