esakal | नवी मुंबई, ठाण्याच्या वेशीवर 'घडतोय' हा प्रकार!
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई, ठाण्याच्या वेशीवर 'घडतोय' हा प्रकार!

मागील आठवडाभरापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील पथदिवे बंद आहेत. नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या वेशीवरील असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये हा प्रकार पाहण्यास मिळत आहे.

नवी मुंबई, ठाण्याच्या वेशीवर 'घडतोय' हा प्रकार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मागील आठवडाभरापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील पथदिवे बंद आहेत. नवी मुंबई व ठाणे महापालिकेच्या वेशीवरील असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये हा प्रकार पाहण्यास मिळत आहे. यामुळे वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटसवर वाहने चालवावी लागत आहेत. रस्त्यावरील या अंधारामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबापुरीची गगनचुंबी वाटचाल!

ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा येथील ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या कमानीपासून प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकांपर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याच मार्गावर ठाण्याकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावर नवी मुंबई महापालिकेने शौचालय बांधले आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या खासगी बसेस लघुशंका करण्यासाठी थांबतात. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या अंधाराच्या साम्राज्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विटावा, गणपती पाडा येथील नागरिक संध्याकाळी व सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉकसाठी या परिसरात जातात. मात्र या ठिकाणी असणाऱ्या अंधारामुळे त्यांची गैरसोय होत आहे. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये रस्त्यांची; तसेच अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी बाग तयार करून हा परिसर अतिक्रमणमुक्त केला आहे. मात्र रस्त्यावरील अंधारामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 

ही बातमी वाचली का? तो तिला गोड बोलून घरी घेऊन जायचा आणि...

मागील आठवडाभरापासून विटाव्याच्या कमानीपासून मुकंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तरी लवकरात लवकर या ठिकाणचे पथदिवे सुरू करण्यात यावेत. 
- सागर कांबळे, वाहनचालक.