बांधकाम व्यावसायिकांकडून दोन पोलिसांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

भिवंडी : भिवंडी-कल्याण महामार्गावरील कोनगाव येथे एका बांधकाम व्यावसायिकाने दोघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. नंदकुमार विठ्ठल पाटील (वय 51) असे मारहाण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

सुनील आव्हाड आणि बुधा कोकतरे अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत. सुनील आव्हाड हे वाहतूक शाखेचे, तर बुधा कोकतरे हे पोलिस नाईक आहेत. सुनील आव्हाड हे दुपारी कोनगाव येथील शिवसेना शाखा चौकात वाहतुकीचे नियमन करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना त्यांनी माघारी फिरण्यास लावले. त्या वेळी नंदकुमार पाटील याने त्यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. या प्रकारानंतर नंदकुमार पाटील याने आव्हाड यांच्याशी धक्काबुक्कीही सुरू केली.

या वेळी बुधा कोकतरे त्यांच्या मदतीला धावून गेले; मात्र त्यांनाही बिल्डर नंदकुमार याने शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात नंदकुमार पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. 

Web Title: Builders beat up two policemen