मोठी घटना! भिवंडीत वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली; 40 ते 50 जण अडकल्याची भीती

अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे
building collapsed in Bhiwandi
building collapsed in BhiwandiEsakal

भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीत वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

building collapsed in Bhiwandi
Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीवरील चौघांना उडवलं; आई वडिलांसह मुलीचा मृत्यू

भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारतीचे आहे. इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30 जण काम करत होते. तर वरती रहिवासी होते. जीवितहानी होण्याची मोठी भीती वर्तवण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू आहे.

building collapsed in Bhiwandi
Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मोठा धक्का! अंबाजोगाई बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com