esakal | मुंबईतल्या GTB नगरमध्ये कोसळला इमारतीचा स्लॅब
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतल्या GTB नगरमध्ये कोसळला इमारतीचा स्लॅब

बुधवारी जीटीबी नगरमधील पंजाबी कॉलनीत असलेल्या एका इमारतीचा स्लॅबचा एक भाग कोसळला आहे. ही इमारत BMCनं जीर्ण झाल्याची घोषणा केली होती.

मुंबईतल्या GTB नगरमध्ये कोसळला इमारतीचा स्लॅब

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः बुधवारी जीटीबी नगरमधील पंजाबी कॉलनीत असलेल्या एका इमारतीचा स्लॅबचा एक भाग कोसळला आहे. ही इमारत BMCनं जीर्ण झाल्याची घोषणा केली होती. पण पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत हजारोहून अधिक रहिवासी अजूनही तिथेच राहत आहेत. 

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  वसंत शाह रोडवरील पंजाब कॉलनीत दुपारी ३.१० वाजता इमारतीच्या क्रमांक १३ मधील स्लॅबचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती बीएमसी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेत सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र सर्व इमारती जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती बीएमसीच्या एका अधिकाऱ्यानं  दिली.

अधिक वाचाः  जबरदस्त! मुंबईत अवघ्या 'इतक्या' हजार रुग्णांवर उपचार सुरु

या वसाहतीत २५ इमारती आहेत, ज्यात 1950 च्या दशकापासून पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशातील कुटूंबियांचे रहिवासी राहतात. मागील अनेक वर्षांपासून आणि दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व इमारती जीर्ण स्थितीत असल्याची नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॉलनीच्या आवारात लावली आहे. या नोटीसनुसार पालिकेनं स्थानिकांना या इमारती रिकाम्या करण्यास सांगितलं आहे.

हेही वाचाः  हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आली 'ही' आनंदाची बातमी

मंगळवारीही हाच इशारा देत नोटीस लावली आणि पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिकांना इमारत रिकामी करण्यास सांगितलं होतं. जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी काही रहिवाशांना एका दिवसासाठी इतर भागात हलविण्यात देखील आलं. 

भानुशाली इमारत कोसळली 

काही दिवसांपूर्वी फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली भानुशाली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर २३ हून अधिक लोकांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही काही कुटुंबं इमारतीत राहत होती.  भानुशाली इमारतीच्या मालकाचं नाव मोती भाटीया असं आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही रहिवाशी आणि व्यावसायिक होती.

Building Slab Collapses GTB Nagar Punjabi Colony

loading image