Bull Fight Competition : बैलांच्या झुंजीत किंग आणि भावड्या जखमी

कल्याण जवळील अटाळी गावात रविवारी सकाळी बैलांच्या झुंजी खेळवण्यात आल्या. या झुंजीत किंग आणि भावड्या हे दोन झुंजीचे बैल जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Bull Fight Competition
Bull Fight CompetitionSakal

डोंबिवली - कल्याण जवळील अटाळी गावात रविवारी सकाळी बैलांच्या झुंजी खेळवण्यात आल्या. या झुंजीत किंग आणि भावड्या हे दोन झुंजीचे बैल जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आपल्या बैलाला जिंकून आणण्यासाठी दोन्ही मालकांनी हरतऱ्हेची मेहनत घेतली. तथापि जिंकण्याच्या चढाओढीत दोन्ही बैलांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या.

हौस आणि निष्काळजीपणातून हा प्रकार घडल्याने खडकपाडा पोलिसांनी दोन्ही बैल मालकांवर प्राण्यांना निर्दयीपणे वागविणे प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र नामदेव पाटील (वय 54) आणि हेमंत राम पाटील (वय 23) अशी दोन बैल मालकांची नावे आहेत.

खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या आदेशावरून सरकारतर्फे हवालदार राजू लोखंडे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अटाळी गावातील कालिका माता मंदिराच्या मागील गुरचरण जमिनीवर बैलांच्या झुंजीचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. मालक नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या किंग बैलास प्रतिस्पर्धी मालक हेमंत पाटील यांच्या भावड्या बैलाशी झुंजविले. या झुंजीत दोन्ही बैल जखमी झाले.

पोलिसांच्या पथकाने अटाळी गावात जाऊन बैलांच्या झुंजी कुणी आयोजित केल्या होत्या ? याची माहिती काढली. नामदेव आणि हेमंत यांनी आपल्या बैलांना झुंजविल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी नरेंद्र आणि हेमंत यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दोघांनी बैलांच्या झुंजी लावल्याची कबुली दिली. पोलिसांनी किंग आणि भावड्या बैलाची पाहणी केली. त्यावेळी एक बैलाच्या कपाळाला, तर दुसऱ्याच्या मानेवर धारदार शिंंगे लागल्याचे पोलिसांना आढळून आले.

या दोन्ही मालकांनी प्राण्यांना निर्दयपणे वागवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. खडकपाडा पोलिसांनी बैल मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला. या बैलांवर घरगुती पध्दतीने वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे बैल मालकांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविल्यापासून पुन्हा बैलांच्या शर्यतींसह आता बैलांच्या झुंजींचे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. यामध्ये बैलांना गंजा आणि दारू पाजली जाते. त्यांच्या लवण्या झोडल्या जातात. त्यांना अमानुषपणे मारले जाते. यातूनच बैल मस्तवाल होऊन खवळतात, असे प्राणी मित्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com