जुन्या वाहनांवर हरित कराचा भार!

जुन्या वाहनांवर हरित कराचा भार!
जुन्या वाहनांवर हरित कराचा भार!

नवी मुंबई : शहरात पंधरा वर्षांहून अधिक काळ वापरात असलेल्या जुन्या वाहनांवर हरित कर वसूल करण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ज्या वाहनांचा हरित कर थकीत आहे. अशा वाहनधारकांनी आपल्या कराचा भरणा त्वरित करण्याचे आवाहन आरटीओ विभागामार्फत करण्यात आले आहे; अन्यथा १ डिसेंबरपासून आरटीओ अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाद्वारे या जुन्या वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली. 

आरटीओकडून कराच्या माध्यमातून महसुली उत्पन्नवाढीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहन नोंदणी झाल्याच्या १५ वर्षांनंतर (आरटीओ टॅक्‍स संपल्यानंतर) खासगी वाहनधारकांना वाहन रस्त्यावर चालवायचे असल्यास शासनाकडे हरित कर भरावा लागतो; परंतु ९० टक्के खासगी वाहनचालकांना हरित कर काय असतो, याची कल्पनादेखील नाही. त्यामुळे जे वाहनचालक १५ वर्षांहून अधिक कालावधी झालेले खासगी  दुचाकी अथवा चारचाकी वाहन अद्यापही चालवत आहेत. अशा वाहनचालकांनी संबंधित वाहनाचा हरित कर भरला आहे की नाही, याची खातरजमा करून घेण्याचे आवाहन आरटीओ विभागाने केले आहे. हरित कर न भरता वाहने रस्त्यावर चालवत असल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहन जप्त करण्याची कारवाई आरटीओ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत हरित कराचा भरणा करावा. असे आवाहनही आरटीओ अधिकारी वाघुले यांनी केले आहे. 

१५ वर्षांहून अधिक काळ वापरात असलेल्या वाहनांवर हरित कर  आकारला जाणार आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून अशी वाहने बेकायदा रस्त्यावर चालवल्यास, आरटीओ विभागाच्या भरारी पथकाद्वारे जप्तीची कारवाई केली जाणार आहे.  
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com