
Mumbai: नवे वर्ष मुंबईकरांवर करवाढ लादणारे ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे करवाढीचे प्रस्ताव प्रलंबित असून, निवडणुकीनंतर मुंबईकरांवर मालमत्ता कर, कचरा निर्मूलन कर, बेस्ट दरवाढ, पाणी दरवाढ लादण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता करावर पालिकेचा भर आहे. व्यावसायिक वापर होत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर लागू केला जाणार आहे. मुंबईत हजारो झोपड्या पालिकेच्या नागरी सुविधांचा लाभ घेत व्यवसाय करून फायदा घेत असतात; मात्र अशा झोपड्या मालमत्ता कर देत नाहीत. त्यामुळे पालिकेने आता व्यावसायिक वापर होत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार असून, पालिका निवडणुकीनंतर मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता आहे.