भिवंडीत नऊ लाखांची घरफोडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

शहरातील मिल्लतनगर परिसरातील शालीना हाईट्‌स येथे एका यंत्रमाग व्यापाऱ्याच्या बंद घरात चोरी झाली आहे.

भिवंडी : शहरातील मिल्लतनगर परिसरातील शालीना हाईट्‌स येथे एका यंत्रमाग व्यापाऱ्याच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्याने सुमारे पाच लाखाच्या रोख रकमेसह चार लाख 80 हजार रुपयांचे 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 
असा सुमारे 9 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. 25) रात्री घडली.

निजामपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. इशराक मिरझा (64) असे घरमालकाचे नाव आहे. मिरझा हे कुटुंबीयांसह कोपरखैरणे येथे नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधत चोरट्याने घराच्या शौचालयातील खिडकीवाटे घरात प्रवेश करून 9 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करीत आहेत. 

web title : Burglary in Bhiwandi of nine lakhs 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary in Bhiwandi of nine lakhs