esakal | चोराच्याच घरात झाली घरफोडी, सगळं घडलं 'त्या' कोरोनामुळे... 
sakal

बोलून बातमी शोधा

चोराच्याच घरात झाली घरफोडी, सगळं घडलं 'त्या' कोरोनामुळे... 

कुटुंबाला विलगीकरणात ठेवले असताना झाली घरफोडी

चोराच्याच घरात झाली घरफोडी, सगळं घडलं 'त्या' कोरोनामुळे... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील चेंबूर येथील एका कुटुंबाला विलगीकरण कक्षात  ठेवले असताना घरात चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे याच कुटुंबातील एका सदस्याला चोरीच्या गुन्ह्यात नेहरू नगर पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले होते.

या कुटुंबातील एका व्यक्तीला घरफोडीच्या गुन्ह्यात नेहरू नगर पोलिसांनी अटक केली होती. त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. आता याच आरोपीच्या घरात चोरी झाल्यामुळे पोलिसही या सर्व प्रकरणाबाबत चक्रावले आहेत.

BIG NEWS मुंबई विमानतळावरुन विमान उड्डाणांची संख्या वाढणार, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

तक्रारीनुसार कुटुंबातील आठ सदस्यांना देवनार येथील विलगीकरण कक्षात ठेवले असताना शेजा-यांनी दूरध्वनी करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. हे कुटुंब चेंबूर येथील मालेकरवाडीतील रहिवासी आहे. या कुटुंबातील एका सदस्यांला  नेहरू नगर पोलिसांनी इलेकट्रॉनिक वस्तूच्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी सहा साथीदारांसह अटक केली होती. त्यातील पाच जणांना कोरोना झाल्याचे पाच जूनला स्पष्ट झाले होते. त्यावर मानवतेच्या दृष्टीकोनातून न्यायालयाने या सर्वांना जामिन दिला. त्यानंतर या कोरोनाबाधीत आरोपींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यावेळी या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली. त्यावेळी एक आरोपीने तो चेंबूरमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असून कुटुंबातील सदस्य त्याच्या संपर्कात आल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार 8 जूनला त्यांना देवनार व सिंद्धार्थ नगर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यामुळे घरात कोणीच उपस्थित नव्हते. त्यावेळी शेजा-यांनी दूरध्वनी करून घरात चोरी झाल्याचे सांगितले.

BIG NEWS काँग्रेसचा बडा नेता म्हणतोय, मलाही आत्महत्या करायचे विचार यायचे...

त्यानुसार परवानगी घेऊन याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. दोन लाख 50 हजारांची रोख व दोन लाखांचे सोने असे एकूण साडे चार लाखांची मालमत्ता चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The burglary took place in the thiefs house unique indecent recorded in mumbai