
Mumbai News: कुर्ला पश्चिम येथे ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातास चालकच जबाबदार होता. भाडेतत्त्वावरील कंपनीने त्यास पुरेसे प्रशिक्षण दिले नव्हते. त्याची बेस्ट कर्मचाऱ्यांनीही खात्री केली नव्हती. बसमध्ये कोणताही यांत्रिक दोष नव्हता, असा निष्कर्ष बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत चौकशी अहवालात मांडण्यात आला आहे.