
बसचा क्लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला.
मुंबई : बसचा क्लीनर तोल जाऊन दरवाजातून बाहेर फेकला गेल्याने बसच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मालवणी येथे हा विचित्र अपघात झाला असून पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे.
इक्बाल अहमद आशिक अली (वय 44) असे मृताचे नाव आहे. तो नुकताच खासगी ट्रॅव्हल्समध्ये कामाला लागला होता. चालक रणजीत सिंग राम सिंग (48) हा सर्व प्रवाशांना सोडून बस घेऊन हिंदुस्तान नाक्याच्या दिशेने निघाला होता.
त्या वेळी बस उभी करत असताना अली दरवाजाशेजारी आला. त्या वेळी तोल गेल्याने तो बसच्या बाहेर पडला आणि मागच्या चाकाखाली चिरडला गेला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
web title : Bus cleaner dies in strange accident