esakal | निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 
sakal

बोलून बातमी शोधा

निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

केंद्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारा अहवाल समोर आला. यामध्ये १५ मे पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाख इथवर जाण्याची शक्यता आहे.

निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनामुळे मुंबईकरांच्या चिंतेत दिवसागणिक वाढ होताना पाहायला मिळतेय. केवळ दोन दिवस कमी झालेले कोरोना रुग्णांचे आकडे आणि त्या नंतर पहिले पाढे पंचावन्न. याला स्वतः मुंबईकरच जबाबदार आहेत. कारण सरकार आणि सर्व माध्यमांकडून, डॉक्टरांकडून वारंवार सांगूनही मुंबईकर घराबाहेर जाताना पाहायला मिळतात. मग कधी त्याला कारण असतं भाजीचं कधी मेडिकलचं. कधीही न थांबणाऱ्या मुंबईला घरात राहण्याची सवय नाहीये आणि त्यामुळे मुंबईकर काहीनाकाही कारण काढून घराबाहेर पडतोय.

मोठी बातमी - महाविकास आघाडीतील 'एका' मंत्र्याची तब्येत बिघडली, कोरोना टेस्ट रिपोर्ट येणं बाकी..

अशात केंद्राच्या आरोग्य विभागाकडून एक चिंता वाढवणारा अहवाल समोर आला. यामध्ये १५ मे पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाख इथवर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील कंटेनमेंट झोनमधील वर्सोवा कोळीवाड्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली 

मोठी बातमी - लोकं अडचणीत आहेत, तुम्ही प्रसिद्धीसाठी भिकारी!

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा कोळीवाड्यात 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. वेसावे कोळी जमात संघटनेची आज एक बैठक पार. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकमताने या सर्वांनी हा महत्त्वाचा घेतला आहे. वर्सोवा कोळीवाड्यात आतापर्यंत आढळले कोरोना पॉझिटिव्ह 17 रुग्ण आढळले आहेत. यापैकी पाच रुग्ण आता 5 रुग्ण आता उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन स्वतःच्या घरी परतण्याचा स्थितीत आहेत. 

decision is taken people to observe strict janata curfew from 24th to 26th april

loading image
go to top