मोठी बातमी - महाविकास आघाडीतील 'एका' मंत्र्याची तब्येत बिघडली, कोरोना टेस्ट रिपोर्ट येणं बाकी..

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 22 April 2020

मुंबईकरांची आणि राज्याच्या कारभार सांभाळणाऱ्या सर्व मंत्र्यांची काळजी वाढवणारी बातमी आता समोर येतेय. 

मुंबई - मुंबईकरांची आणि राज्याच्या कारभार सांभाळणाऱ्या सर्व मंत्र्यांची काळजी वाढवणारी बातमी आता समोर येतेय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची तब्येत अचानक बिघडलीये. मिळालेल्या माहितीप्रमाणे या मंत्र्याने सोमवारी मंत्रालयातील एका बैठकीला हजेरी देखील लावल्याचं समजतंय. या मंत्र्याला मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काल दाखल करण्यात आलंय.

सोमवारी मंत्रालयातील बैठकीला हजेरी लावल्यानंतर मंगळवारी त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथंच त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान मधल्या काळात त्यांना अनेक कार्यकर्ते भेटले असण्याची शक्यता आहे, काही अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यांचे अंगरक्षक, कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना आता क्वारंटाईनमध्ये जाण्याचं सुचवण्यात आलंय.  

आता समोर येणाऱ्या माहिती प्रमाणे काल त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे, ज्याचे रिपोर्ट्स अजूनही आलेली नाही.      

महत्त्वाच्या बातम्या : 

नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीतून आली धक्कादायक बातमी; पालिका प्रशासनाची उडाली झोप

मातोश्री मागोमाग वर्षाच्या दारावरही कोरोनाची ठकठक; वर्षावर तैनात महिला पोलिसाला कोरोना

सर्वात मोठी ब्रेकिंग - मुंबईत १५ मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा साडे सहा लाखांवर जाण्याची भीती 

कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या

धोक्याची घंटा, नागरिकांनो सावधान ! वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतायत 'मे' महिन्यात कोरोनाचा विस्फोट

big news one minister of mahavikas aaghadi detected positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big news one minister of mahavikas aaghadi detected positive