कोरोना चाचण्यांच्या नावाखाली 'केडिएमसी'चा व्यवसाय; रुग्णांकडून तीन हजार रुपयांची वसूली

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 23 May 2020

महापालिकेने कोरोना चाचाणीसाठी आता प्रत्येक व्यक्ती कडून तीन हजार रूपये आकारण्यास सुरूवात केली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण.... वाचा

मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला, परंतु लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य़ जनतेचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने कोरोना चाचणीचा व्यवसाय सुरू केलाय का असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पडू लागला आहे. कारण महापालिकेने कोरोना चाचाणीसाठी आता प्रत्येक व्यक्ती कडून तीन हजार रूपये आकारण्यास सुरूवात केली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण.... वाचा

...म्हणून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन नाही; उड्डानमंत्र्यांचा अजब निर्णय

ज्यात आणि विशेषतः कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता अनेक नागरिक आपली कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु कोरोना चाचणीसाठी आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रतिव्यक्ती तीन हजार रुपये आकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारन आणि महानगरपालिकेने आरोग्य सेवेच्या नावाखाली व्यवसाय सुरू केला असल्याची टीका भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. आमदार गायवाड म्हटले की, रेशन कार्डचा रंग पाहून उपचारासाठी रुग्णांकडून पैसे वसूल केले जात आहेत. आता तर एका व्यक्तीकडून चाचणीचे तीन हजार रुपये घेण्यास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी! शालेय शिक्षणाबाबत निती आयोगाने प्रसिद्ध केला अहवाल; वाचा राज्याची क्रमवारी

 कामगार, मजूर आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांच्या हाताला सध्या काम नाही. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खऱे तर यांच्या मदतीला धावून जाणे हे पालिकेचे काम असताना. चाचणीचे पैसै आकारून पालिकेने कहर केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सरकार कोरोनाचा संसर्ग रोखण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करून राज्यभर भाजपने महाराष्ट्र वाचवा आंदोलन केले आहे.  त्या आंदोलनाला उत्तर देत महाराष्ट्रद्रोही भाजप हा ट्रेंड समाजमाध्यमांवर सुरू केला. सरकारने कामगार, मजूर, मध्यमवर्गीय, लघु उद्योजक सर्वच क्षेत्रातील पीडित लोकांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे.

दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

एकीक़डे राज्यात भाजप सरकार विरोधात आक्रमक झाला असताना, आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनावर विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: business under the name of covid 19 testing 3 thousand are being taken from patient say bjp mla ganpat gaikwad