...म्हणून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन नाही; उड्डानमंत्र्यांचा अजब निर्णय

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांवर 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम लागू  नसणार आहे. नागरी उड्डयन मंत्री हरिदिप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली आहे.

 
मूंबई ; विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांवर 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम लागू  नसणार आहे. नागरी उड्डयन मंत्री हरिदिप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली आहे.मुळात कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीला विमानतळाच्या आवारात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे क्वारंटाईन करण्याचा प्रश्न गैरलागू आहे. असा युक्तीवादही हरिदीप सिंह पुरी यांनी केला. या निर्णयामुळे वेगळाच वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.यापुर्वी कामगार आणि विमान प्रवाशांना मिळणाऱ्या वागणूकीवरुन सोशल माध्यमांवर प्रचंड टिका झाली होती. 

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी! शालेय शिक्षणाबाबत निती आयोगाने प्रसिद्ध केला अहवाल; वाचा राज्याची क्रमवारी

दुसरीकडे रेल्वे बुकींग करतांना प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सुरु होणार नाही. सध्या रेल्वे प्रवास, खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना  क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. प्रत्येकाला विमान प्रवासानंतर 14 दिवस क्वारंटाईन करणे, व्यवहार्य नाही असही पुरी यांनी म्हटले आहे. मात्र  सुरुवातीच्या काळात अनेक विमान प्नवासी घरी गेल्यानंतर त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे आढळून आली होती. प्रवाशी आणि विमान कर्मचाऱ्यांना विमानतळापर्यंत सार्वजनिक किंवा खाजगी वाहन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राज्य सरकार , विमानतळ व्यवस्थानपनाची आहे.असही नागरी उड्डयण मंत्र्यांनी स्पष्ट केलं.मात्र मुंबईत आजारी रुग्णांना टॅक्सी मिळत नाही, तिथे विमानतळ गाठण्यासाठी टॅक्सी उपलब्ध होईल याबद्दल सांशकता आहे.

अरे वा! चित्रपटांचे शुटिंगही सुरू होणार? सांस्कृतिक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती.  सोमवारपासून (25 मे) देशाअंतर्गत विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाने तयारी केली आहे.

....
या सेवा मिळणार नाही.

- प्रवासादरम्यान जेवण, नाष्टा
- विमानतळावर वर्तमानपत्र, मॅगझीन 
- काही विशेष बाब सोडली तर  ट्रॉली सेवाही बंद

...
विमान प्रवासासाठीच्या काही नव्या नियमावली 
- प्रवाशांना 2 तासाअगोदर विमानतळावर पोहोचावे लागणार
- बोर्डींग प्रक्रीया विमान सुटण्याच्या 60 मिनीटाअगोदर सुरु होणार 
- बोर्डींग गेट्स विमान सुटण्याच्या वेळेच्या 20 मिनीटाआधी बंद होईल.
- वेब चेक इन द्वारे प्रवाशांना विमानतळावर प्रवेश करता येणार 
- कुणाचाही शारीरीक तपासणी होणार नाही
- प्रवाशांना थर्मल स्क्रिंनींग झोनमधून चालत जावे लागणार
- मास्क आणि हातमोजे घालणे अनिवार्य 
-14 वर्षाच्या वरील सर्वांना आरोग्य सेतू अँप्स डाऊनलोड करणे बंधनकारक 
- केवळ एकचं बॅग सोबत घेण्याची मुभा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... so airline passengers do not have a 14-day quarantine; Strange decision of the aviation minister