

Mumbai Rani Baug Penguin Room
ESakal
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणी बाग) येथील पेंग्विन कुटुंब झपाट्याने वाढत असून, आता या थंड प्रदेशातील पाहुण्यांसाठी महापालिकेकडून नव्या निवासस्थानाचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात एकूण २१ पेंग्विन आहेत. सध्याच्या वसाहतीत कमाल २५ पेंग्विनपर्यंतच व्यवस्था शक्य आहे. त्यामुळे वाढत्या पेंग्विन संख्येनुसार नव्या विस्ताराची गरज भासू लागली आहे.