
मुंबई : मुंबईतील भायखळा येथे स्थित असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते. इतकेच नव्हे तर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांसह इतर सुट्टीच्या कालावधीत या राणीच्या बागेत अनेक पर्यटकांची हजेरी लागते. मात्र सध्या महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात साजरा होणारा १० दिवसांचा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.