आज केबल बंद; कसे होणार मनोरंजन?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) छुपी दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी केबलचालक उद्या (ता. 27) सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत सर्व वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद ठेवणार आहेत. राज्यभरातील केबल ऑपरेटर व डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनच्या सभेत बुधवारी (ता. 26) हा इशारा देण्यात आला.

ट्रायने आदेश देऊनही बड्या परदेशी वाहिन्यांनी "पॅक'च्या नावाखाली छुपी दरवाढ केली आहे. ग्राहकांची लूट करून ते पैसे परदेशी नेले जाणार आहेत, असा आरोप या बैठकीत असोसिएशनने बुधवारी केला. ही दरवाढ मागे घेऊन ग्राहकांवरील भार कमी करावा किंवा जुनी पद्धतीच कायम ठेवावी, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अनिल परब यांनी केली आहे.

"पेड चॅनल्स'नी कार्यक्रमादरम्यान जाहिराती दाखवू नयेत व छुपी दरवाढ कमी करावी यासाठी शुक्रवारी "स्टार वाहिनी'वर केबलचालकांचा मोर्चा नेला जाईल, अशीही घोषणा या वेळी करण्यात आली.

Web Title: Cable Owner Strike