फडणवीसांच्या काळात सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढवणारी. CAG च्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. सूत्रांकडून ही माहिती समोर येतेय. CAG ने दिलेल्या अहवालानंतर या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी केली आहे. सिडकोमधील घोटाळ्याबाबत CAG ने दिलेल्या अहवालासंबंधी कॅबिनेटमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येतेय. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात सिडकोमध्ये अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं CAG च्या अहवालात म्हटलंय असं सूत्रांकडून समजतंय. 

मोठी बातमी - मॉलमध्ये घुमली दीड वर्षीय चिन्मयची किंचाळी, आई बाबा पोहोचेपर्यंत उशीर झालेला...

काय म्हणालेत सुनील प्रभू 
CAG ने ज्या पद्धतीने फडणवीस सरकारवर सिडकोमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवलाय असं असल्यास ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा पद्धतीने या अहवालात भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जावी. सरकारने सत्य समोर आणावं, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल. 

मोठी बातमी - तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

काय म्हणालेत सुधीर मुनगंटीवार 
याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीये. देवेंद्रजी आणि मी (सुधीर मुनगंटीवार) स्वतः सांगत आहोत की जर यामध्ये तथ्य असेल आणि कुणी घोटाळा केला असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. यामध्ये तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती केली पाहिजे. मात्र सुतावरून स्वर्ग गाठायचा असं होता काम नये. संशय ठेऊ नका, असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. 

CAG report scam in cidco during fadanavis government sources

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAG report scam in cidco during fadanavis government sources