मॉलमध्ये घुमली दीड वर्षीय चिन्मयची किंचाळी, आई बाबा पोहोचेपर्यंत उशीर झालेला...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मुंबई - कायम सांगितलं जातं की लहान मुलांकडे लक्ष द्या. आपलं जरा दुर्लक्ष आणि लहान मुलांचा कोणता प्रताप आपल्याला पाहायला मिळेल काही सांगता येत नाही. आपण घरात असताना आणि बाहेर असताना आपल्या लहान मुलांकडे आपलं लक्ष असणं किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला या बातमीतून नक्की समजेल. ही बातमी आहे मुंबईतील मुंलुंड भागातील. मुंलुंडमध्ये आर मॉल नामक एक मॉल आहे. या मॉलमध्ये दीड वर्षांचा चिमुकला चिन्मय आपल्या आई वडिलांसोबत आला होता. 

VIDEO - प्रचंड व्हायरल ! रस्त्यावरून चालणारी ती 'डोकं' नसलेली व्यक्ती कोण...

मॉलमध्ये खरेदी करून झाली. आई बाबा आणि दीड वर्षांचा चिन्मय पहिल्या मजल्यावरून (एस्किलेटर) सरकत्या जिन्यांवरून खाली आले. आई वडिलांची नजर चुकवून चिन्मय पुन्हा या जिन्याकडे गेला. आई वडील आपल्याकडे पाहत नाही म्हणत त्याने जिन्यावर चढण्याचा प्रयत्न केला. या जिन्यांना वेग असल्याने एस्किलेटरवर चढताना चिन्मय खाली पडला. खाली पडल्याने चिमुकल्या चिन्मयची तीन बोटं या जिन्याचा पॅसेजमध्ये अडकली आणि होत्याचं नव्हतं झालं. बोटं अडकल्याने चिन्मय जोरात ओरडला, त्याची किंचाळी आई बाबांच्या कानावर पडली. मात्र आई बाबा चिन्मयपर्यंत पोहोचतील तोवर लहानग्या चिन्मयची तीन बोटं तुटलेली होती.    

धक्कादायक! म्हणून त्याने पत्नीला व्हिडीओ कॉल करून दिला ट्रिपल तलाक
     
तातडीने आई बाबांनी या चिमुकल्याला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेलं खरं. मात्र चिन्मयच्या नसा दबल्या गेल्याने दीड वर्षीय चिन्मयला आपली तीन बोटं गमवावी लागली आहेत. डॉक्टरांना ही बोटं पुन्हा जोडता आलेली नाहीत. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 

आपल्या आसपास स्टेशनवर, मॉलमध्ये असे सरकते जिने असतात. मात्र हे जिने कसे जीवघेणे ठरू शकतात हे वरील घटनेमुळे स्पष्ट होतं. यात आई बाबांची चूक का मॉल प्रशासनाची चूक हा मोठा प्रश्न आहे. खरंतर अशा जिन्यांमध्ये काही अडथळा आला तर हे जिने आपसूक बंद व्हायला हवेत. किंवा अशा अप्रिय घटना घडू नयेत म्हणून एक माणूस तिथे नेमला पाहिजे. मात्र अशी कोणतीच व्यवस्था कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे अशा घटना टाळायच्या असतील तर आपणच आपल्या मुलांवर जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे.    
one and half year kid trapped in escalators at mulund r mall lost three figures

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one and half year kid trapped in escalators at mulund r mall lost three figures