esakal | तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

आपल्या आयुष्यात प्रेम नेहमीच आपल्याला आनंदाचे आणि अविस्मरणीय असे क्षण देत असतं. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय हा अनुभवच भन्नाट आणि वेडं करणारा असतो. प्रेमात योग्य पार्टनर मिळणंही महत्वाचं असतं. मात्र प्रेमात सगळ्यांचंच नशीब सारखं नसतं. आपली गर्लफ्रेंड आपल्यावर खर्च प्रेम करते का हे अनेकांना माहितीच नसतं. अनेकांनी वेळोवेळी सूचित करूनही आपण ऐकत नाही मात्र वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर प्रेम करत नाही. मात्र आता तुमची गर्लफ्रेंड खरंच तुमच्यावर प्रेम करते का हे जाणून घेण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत. 

तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आपल्या आयुष्यात प्रेम नेहमीच आपल्याला आनंदाचे आणि अविस्मरणीय असे क्षण देत असतं. आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय हा अनुभवच भन्नाट आणि सुखद असतो.  प्रेमात योग्य पार्टनर मिळणंही महत्वाचं असतं. मात्र प्रेमात सगळ्यांचंच नशीब सारखं नसतं. आपली गर्लफ्रेंड किंवा आपला बॉयफ्रेंड आपल्यावर खरंच प्रेम करतो का ?  हे अनेकांना काळात नाही. अनेकांनी वेळोवेळी सूचित करूनही आपण त्यांचं अजिबात  ऐकत नाही. मात्र वेळ निघून गेल्यानंतर कळतं की तुमची गर्लफ्रेंड किंवा बोफ्रेन्ड  तुमच्यावर प्रेम करत नव्हते. मात्र आता तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो का हे जाणून घेण्याच्या काही सोप्या पद्धती जाणून घ्या.  

मोठी बातमी - फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही...

तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड फक्त पैसे मिळवण्यासाठी किंवा तुमचा उपयोग करून घेण्यासाठी तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का हे जाणून घेण्यासाठी काही गोष्टींवरती नेहमी तुमची नजर असली पाहिजे. त्यावरून तुम्हाला समजेल तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर खरंच किती प्रेम करते. 

(१) पैशांची सतत मागणी:

जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड सतत तुम्हाला शॉपिंगसाठी, महागड्या वस्तु खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करत असेल तर रिलेशनशिपमद्धे इथेच थांबण्याची वेळ आहे. कारण जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड सतत तुम्हाला पैशांची मागणी करत असेल तर याचा अर्थ त्याचं किंवा तिचं तुमच्यावर नाहीतर तुमच्या पैशांवर प्रेम आहे. मात्र जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला पैसे कमी खर्च करण्याचा सल्ला देत असेल किंवा इन्वेस्टमेंटचा सल्ला देत असेल तर तुम्ही परफेक्ट मुलं किंवा मुलीसोबत आहात. 

हेही वाचा : फक्त हे कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही.. 

(२) सतत रुसवा आणि महागड्या गिफ्टची मागणी:

जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्ही महागडे गिफ्ट्स दिले नाहीत म्हणून सतत तुमच्यावर रुसत असेल किंवा जोपर्यंत तुम्ही एकमेकांना महागडे गिफ्ट्स आणून देत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत बोलत नसेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. मात्र याउलट जर तुमच्यात भांडण झाल्यावर तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड महागड्या गिफ्ट्सपेक्षा तुम्ही प्रेमानी बोललेल्या दोन शब्दांवर प्रेम करत असेल तर तुम्ही परफेक्ट पार्टनरसोबत आहात. 

(३) महागड्या ठिकाणी घेऊन जाण्याची मागणी:

तुमच्यासोबत प्रेमाचा आणि रोमॅंटिक वेळ घालवण्यापेक्षा जर तुमच्यासोबत सतत महागड्या हॉटेल्समध्ये जाण्याची मागणी होत असेल तर सावधान. किंवा तुम्हाला महागड्या ठिकाणी ट्रीपला नेण्याची मागणी होत असेल तरीही सावधान. कारण तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला प्रेम करत नाही हे निश्चित. मात्र तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला फक्त तुमच्यासोबत असणं महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही परफेक्ट रिलेशनशिपमध्ये आहात.

हेही वाचा: काळ्या मातीत फुलली लालेलाल स्ट्रॉबेरी  

(४) दुसऱ्या मुला-मुलींशी बोलणे:
 
तुम्ही दोघं फिरायला सोबत गेले असताना जर तुमचा बॉयफ्रेडन किंवा तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी बोलणं सोडून इतर मुलांकडे बघत असेल किंवा सोशल मीडियावर अनेक मुला मुलांशी बोलत असेल तर तुमच्या पार्टनरचा मित्रमंडळींचा गोतावळा मोठा आहे हे मान्य करावं लागेल. मात्र तुम्ही वेळ घालवत असताना सतत हे होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड जर फक्त तुमच्याशी बोलत असेल आणि तीचं लक्ष फक्त तुमच्यावर असेल तर तुम्ही परफेक्ट मुलीसोबत आहात.    

(५) कुटुंब आणि मित्रांपासून दूर करण्याचा प्रयत्न:
 
रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत असता. मात्र असं करत असताना जर तुमचा पार्टनर तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून किंवा मित्रांपासून दूर करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तुम्ही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये आहात. जर तुमची गर्लफ्रेंड कुटुंबासोबत न बोलण्याचं, त्यांच्यावर पैसे खर्च न करण्याचं, मित्रांसोबत न बोलण्याचं वारंवार तुम्हाला सांगत असेल तर अशा रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याची वेळ आहे. 

मोठी बातमी - बायकोला म्हणालेला "माझा फोन कुणी तरी ओढतंय ग", बास पोलिसांसाठी यावरूनच लावला छडा...

(६) सतत धमकी देणे: 

एका चांगल्या रिलेशनशिपमध्ये असताना धमकी आणि भांडण यांना कुटेही वाव नसतो. मात्र जर तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत तुम्हाला धमक्या देत असेल तर तुम्ही चुकीच्या रिलेशनशिपमध्ये आहात हे समजून घ्या. यावरून हेच सिद्ध होतं की तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करत नाही. 

(७) तुमच्या आत्मसन्मानाला खाली बघणं:

प्रेम हे असं नातं आहे जे फक्त विश्वास आणि सन्मानवर टिकत असतं. रिलेशनशिपमध्ये असताना एकमेकांचा आत्मसन्मान राखणं हे महत्वाचं असतं. मात्र तुमचा बॉयफ्रेंड किंवा तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सतत घालून पाडून बोलत असेल किंवा तुमचा योग्य तो मान राखत नसेल तर ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही हे सत्य आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मान स्वत:च राखणं महत्वाचं आहे.  

how to check whether you are in real relationship or fake relationship love meter

loading image
go to top