डेंगीविरोधात मोहीम 838 ठिकाणे धोक्‍याची 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - डेंगी, हिवतापाला रोखण्यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. त्यानुसार डेंगीचा अधिक प्रादुर्भाव असलेली शहरातील 838 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. तसेच या दोन्ही आजारांची साथ पसरवण्यास साह्य ठरणाऱ्या 3 हजार 620 इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या प्रकरणी 128 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. 

पावसाळ्यात डेंगी-हिवताप डोकेवर काढते. त्यामुळे या आजारांविरोधात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कीटकनाशक विभागातर्फे जानेवारीपासून जनजागृती आणि तपासणी मोहीम राबवण्यात येते. या वर्षी एप्रिलपर्यंत 2 लाख 84 हजार 54 घरे तपासण्यात आली. त्यामध्ये खासगी इमारती आणि घरांमधील तीन लाख चार हजार 388 कंटेनर-ड्रम तपासण्यात आले. या वेळी डेंगीची 838 उत्पत्तिस्थाने आढळली. ती स्थाने नष्ट करण्यात आली. यानंतर उच्चभ्रू वस्तींसह चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती आणि कारवाईचे काम सुरू आहे. 

विशेष पथके तैनात 
डेंगी, हिवताप रोखण्यासाठी मुंबईत जोरदार मोहीम सुरू आहे. यामध्ये 360 स्वयंसेवकांना तैनात केले आहे. शहरातील सर्व 24 विभागांत आज पाच-पाच कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. इमारत, चाळी, झोपडपट्ट्यांमधील साठणारे पाणी, वस्तू, ताडपत्री काढण्याची कारवाई ही पथके करतील. 

साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जनजागृती आणि कार्यवाही सुरू आहे. पालिकेच्या सात परिमंडळांमध्ये वाहने आणि शोल्डर फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणी सुरू आहे. 
राजन नारिंग्रेकर, कीटकनाशक अधिकारी, महापालिका 

डेंगी, हिवताप रोखण्यासाठी तपासलेली घरे - 2 लाख 84 हजार 54 
डेंगी आढळलेली ठिकाणे - 838 
खासगी इमारतींना नोटिसा - 3 हजार 620 
चार महिन्यांतील कारवाईदरम्यान जमा झालेला दंड - 37 लाख रुपये 
गुन्हे दाखल - 128 

Web Title: Campaign for Dengi 838 places