मुंबईतील रणसंग्रामाच्या प्रचाराची धुरा आदित्यकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना दिली असून, त्यांच्या दिमतीला युवा सेनेची फौज दिली आहे. ते सोशल मीडिया आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रचाराची धुरा वाहणार आहेत. त्याची चुणूक त्यांनी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजपला ट्विटरवर उत्तर देऊन दाखवली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडिया ही भाजपच्या प्रचाराची ताकद झाली आहे. त्याला उत्तर देण्याची जबाबदारी शिवसेनेने युवा सेनेला दिली आहे. व्हॉट्‌सऍपवरील प्रचाराची जबाबदारी युवा सेनेवर आहे. मुंबईच्या प्रचाराची धुरा आदित्य यांच्या खांद्यावर आहे. ते भाजपच्या आरोपांना आणि टीकेला ट्विटरवर उत्तर देतील. त्याची त्यांनी सुरवात केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत सर्वपक्षीय सदस्य असतात. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासनाकडून मांडला जातो. अशी पद्धत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये नाही, असा टोला त्यांनी ट्विटरवर लगावला आहे. आदित्य यांचे मुंबईत 24 रोड शो होणार आहेत.

नवमतदारांची फौज भाजपच्या बाजूने असल्याने कुमक रोखण्यासाठी आदित्य यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेला शिवसेनेने कामाला लावले आहे.

Web Title: the campaign has been spearheaded aditya thackeray ransangram