esakal | सामान्य माणसाला फायझरची लस परवडेल?

बोलून बातमी शोधा

फायझर
सामान्य माणसाला फायझरची लस परवडेल?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: येत्या एक मे पासून लसीकरणाचा नवा टप्पा सुरु होतोय. १८ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण सुरु होणार आहे. सध्या लसींचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे १८ वर्षापुढील व्यकींचे लसीकरण सुरु झाल्यानंतर लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील का? या प्रश्नावर तात्याराव लहाने म्हणाले की, "सध्या दोन कंपन्यांच्या लसी उपलब्ध आहेत. केंद्राने राज्याला लस खरेदीची परवानगी दिली आहे. विचार करुनच ही परवानगी दिली आहे. लसींच उत्पादन वाढत आहे."

हेही वाचा: रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

जभरात प्रभावी ठरणारी फायझरची लस परवडणार? या प्रश्नावर तात्याराव लहाने म्हणाले की, "फायझरची लस सामान्य माणसाला परवडणार नाही. पण निश्चित शासनामार्फत ती मोफत दिली जाईल. खासगी दवाखान्यात जाणारा आणि सरकारी दवाखान्यात जाणारा वर्ग वेगळा असतो. ज्यांना फायझरची लस घेणं परवडतय, त्यांना ती लस घेण्यापासून का रोखावं?" कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. इस्रायलला जे शक्य झालय ते लसीकरणामुळे शक्य झाल्याकडे तात्याराव लहानेंनी लक्ष वेधलं.

रेमडेसिव्हीर बद्दल म्हणाले...

"रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना रेमडेसिव्हीरचा फायदा होत नाही. नऊ दिवसानंतर रेमडेसिव्हीर देऊन उपयोग नाही. प्रत्येक जण त्या रेमडेसिव्हीरच्या मागे धावत आहे. गरज आहे तिथे रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे" असे तात्याराव लहाने म्हणाले.

हेही वाचा: रेमडेसिव्हीर म्हणजे अमृत नाही - तात्याराव लहाने

"रेमडेसिव्हीरच्या खरेदीसाठी आंतरारष्ट्रीय बाजारात जाहीरात दिल्या आहेत. पेशंटना बरं करण्यात रेमडेसिव्हीरचा फायदा होतोय. सहाच्या पुढे ही इंजेक्शन्स देऊ नयेत, गाइडलाइन्स पाळल्या तर फायदा होईल" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले.