काय सांगता ! 'सिगारेट' ओढल्याने कोरोनाचा धोका कमी? वाचा कोणी केलाय हा दावा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

 निकोटीनमुळे कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करता येऊ शकेल, असे फ्रान्समधील संशोधनातून दिसत आहे. अर्थात याचा उपयोग कोरोनाचा प्रसार रोखण्यास किंवा कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी होऊ शकेल का याबाबतची चाचणी करण्यात येणार आहे.

मुंबई : निकोटीनमुळे कोरोनाची लागण होण्यापासून बचाव करता येऊ शकेल, असे फ्रान्समधील संशोधनातून दिसत आहे. अर्थात याचा उपयोग कोरोनाचा प्रसार रोखण्यास किंवा कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी होऊ शकेल का याबाबतची चाचणी करण्यात येणार आहे.

मोठी बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

पॅरीसमधील प्रमुख रुग्णालयात कोरोनाचे एकंदर 343 रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यातील 139 जणांना सौम्य लागण झाली होती. दाखल केलेल्या रुग्णात धूम्रपान करीत असलेल्यांचे प्रमाण केवळ पाच टक्के होते. फ्रान्समध्ये धूम्रपान करणाऱ्याचे प्रमाण 35 टक्के आहे, त्यानंतरही कोरोना झालेल्यांत त्यांचे प्रमाण खूप कमी आहे, याकडे फ्रान्समधील अभ्यासक लक्ष वेधत आहेत.

हे ही वाचा :  KEM रुग्णालयात मृतदेह व्यवस्थापन प्रशिक्षण; कोरोनाबाधेच्या धोक्यामुळे उपक्रम

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अहवालात याच प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला होता. चीनमधील एक हजार रुग्णांची तपासणी केली असता, त्यातील केवळ 12.6 टक्के हे धूम्रपान करणारे आढळले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चीनमध्ये 26 टक्के व्यक्ती धूम्रपान करतात. त्यातुलनेत कोरोना झालेल्यात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण कमी आहे. 

नक्की वाचा :  उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

कोरोनाच्या विषाणूला पेशींमध्ये प्रवेश करण्यास निकोटीनमुळे अटकाव होऊ शकतो, त्यामुळे त्याचा प्रसार रोखला जाण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात याबाबतची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी संशोधक आरोग्य आधिकाऱ्यांच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. पॅरीसमधील रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांना निकोटीन पॅचद्वारे संरक्षण देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर रुग्णांवर निकोटीन पॅचेसचा वापर केल्यास कोरोनाची बाधा कमी होण्यास मदत होते का याची चाचणी करण्याचीही परवानगी मागितली आहे. 

नक्की वाचा :  कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

निकोटीनमुळे कोरोना रोखला जात असल्याचे सुरुवातीच्या अभ्यासात दिसले असले तरी संशोधक कोरोना रोखण्यासाठी धूम्रपान सुरु करण्याचा सल्ला देण्यास तयार नाहीत. निकोटीनच्या घातक परिणामाकडे आपण कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करु शकत नाही. जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनी ते करुच नये, त्याचे परिणाम जास्त गंभीर असतील असे फ्रान्समधील प्रमुख आरोग्य आधिकारी जेरोमी सोलोमन यांनी सांगितले. फ्रान्समध्ये दरवर्षी धूम्रपानामुळे 75 हजार लोकांचे निधन होते. कोरोनामुळे फ्रान्समध्ये आत्तापर्यंत 21 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 Can smoking prevent corona? read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can smoking prevent corona? read full story