esakal | कर्करोगावरील बोगस औषधांची विक्री करणाऱ्या महिलेला अटक | Fake medicine
sakal

बोलून बातमी शोधा

woman arrested

कर्करोगावरील बोगस औषधांची विक्री करणाऱ्या महिलेला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : कर्करोगावरील (cancer) बोगस औषधांची विक्री (fake medicine selling) करून कंपनीसह रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या एका महिलेस आर्थिक शाखेच्या सीबी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक (woman arrested) केली. पूजा राणा (वय ३०) असे महिलेचे नाव असून, ती कल्याणच्या मनावलीची रहिवासी आहे. तिच्याकडून पोलिसांनी सुमारे ६८ लाख रुपयांचा बोगस इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त केला.

हेही वाचा: देशातील इलेक्ट्रिक मोटारींची पहिली रॅली; आदित्य ठाकरेंच्या हस्ते हिरवा झेंडा

याच गुन्ह्यांत तिला स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. एक खासगी कंपनी कर्करोगावर औषधांचे उत्पादन करते. या कंपनीची भारतासह विदेशात औषधे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही महिन्यांपासून काही फार्मा कंपन्या त्यांच्या कंपनीच्या बोगस औषधांची विक्री करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ही बाब अत्यंत गंभीर आणि रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण करणारी होती. त्यामुळे कंपनीने आर्थिक शाखेच्या सीबी कंट्रोलमध्ये तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकातील रोहित सावंत, अनिल जायकर, रूपेश दरेकर, एकनाथ देसाई व अन्य पोलिस पथकाने कंपनीच्या प्रतिनिधींसह कल्याण येथील नेतावली नाका, मेट्रो प्लाझाच्या एका कंपनीत छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पूजा राणा या महिलेस अटक केली. कारवाईत पोलिसांनी पाच लाख ८० हजार रुपयांच्या सात बोगस बॉटल इंजेक्शन तर साडेतेरा लाख रुपयांचे दोन बॉक्स गोळ्यांचा साठा जप्त केला. प्राथमिक तपासात जप्त केलेली सर्व औषधे बोगस असल्याचे उघडकीस आले. भारतात या औषधांची परवानगी नसताना त्यांनी ती औषधे विक्रीसाठी ठेवली होती.

loading image
go to top