खायला पैसा नाही, शिकण्यासाठी स्मार्टफोन कसा घेणार

संजय घारपुरे
Friday, 14 August 2020

धारावीतील अनेक मुल-मुली बनियान ट्री इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. त्यांचे पालक रोजगारावर काम करतात. त्यांना आपल्या मुलांसाठी सध्या अतिरीक्त सुविधा घेणे अवघडच आहे. महापालिका शाळेचे शुल्क न परवडणारी मुले या शाळेत शिकत असल्याचे वृत्तात म्हंटले आहे. या शाळेनेही ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात केली, पण अनेक मुलांकडे त्यासाठी आवश्यक असलेला स्मार्टफोनच नाही.

मुंबई ः कोरोना महामारीमुळे ऑनलाईनद्वारे शिक्षण सुरु झाले आहे, पण कोरोना लढाईत जागतिक स्तरावर कौतुक झालेले धारावी ऑनलाईन शिक्षणात मागे पडत आहे. खायला पैसा नाही तर स्मार्टफोन काय खरेदी करणार अशी विचारणा केली जात आहे. 
धारावीतील अनेक मुल-मुली बनियान ट्री इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. त्यांचे पालक रोजगारावर काम करतात. त्यांना आपल्या मुलांसाठी सध्या अतिरीक्त सुविधा घेणे अवघडच आहे. महापालिका शाळेचे शुल्क न परवडणारी मुले या शाळेत शिकत असल्याचे वृत्तात म्हंटले आहे. या शाळेनेही ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात केली, पण अनेक मुलांकडे त्यासाठी आवश्यक असलेला स्मार्टफोनच नाही.

हे वाचा : कोकणातील रेल्वे गाड्यांचा राज्य सरकामुळे खोळंबा?

रिटा कोहरींचे पती टेलर आहेत. ते काम करीत असलेली कंपनीच बंद पडली आहे. रोजच्या जेवणाचा प्रश्न आहे. या परिस्थितीत मुलींसाठी स्मार्टफोन कसा घेणार अशी विचाणा त्यांनी केली. काही वेळा शेजाऱ्यांकडून स्मार्टफोन उसना आणते, पण रोज कसा मागणार अशी विचारणा त्यांनी केली. दोन मुलींसाठी दोन स्मार्टफोन कसे घेणार. शिक्षिका तक्रार करतात, पण आम्ही काय करणार अशी विचारणा त्यांनी केली.

जबरदस्त : धारावीत ऑगस्टमहिन्यात एकही मृत्यू नाही...

राजेश बाबरे आपल्या रायगडमधील गावी परतले आहेत. गणेशोत्सवानंतर परतण्याचा विचार आहे. तेंव्हा नोकरी मिळण्याची त्यांना आशा आहे. तोपर्यंत सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा सतत स्मार्टफोनसाठी हट्ट करतो, पण तो पुरवणार कसा अशी विचारणा त्यांनी केली. 
बनियान ट्री शाळेत शिकणाऱ्या 60 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नाही. हा प्रश्न आहेच, त्याचबरोबर अनेकांकडे चांगले नेटवर्कही नसते, त्याचाही ऑनलाईन शिक्षणावर परिणाम होतो, याकडे शाळेचे चेअरमन परवेझ दमानिया यांनी लक्ष वेधले. आता या प्रश्नावर सध्या तरी तोडगा दिसत नाही. भविष्यात चांगले घडेल अशी आशा करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मानधनात 50 टक्के कपात केली असल्याचे सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cant afford smarthphone, tough to arrange even for meals