खालापुरात कारला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

खालापूर हद्दीत वावंढळ गावानजीक खोपोलीहून पनवेलकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत सुदैवाने सहा जण बचावले आहेत. 

मुंबई : खालापूर हद्दीत वावंढळ गावानजीक खोपोलीहून पनवेलकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता सोडून पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत सुदैवाने सहा जण बचावले आहेत. ही घटना मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत शनिवारी घडली. 

खोपोलीहून पनवेलकडे भरधाव वेगात किरण शरद देसाई (वय 40, रा. बदलापूर) जात होते. त्यावेळी कारमध्ये आणखी पाच जण होते. खालापूर हद्दीत वावंढळ गावानजीक मेट्रो लॉजिंगपुढे देसाई यांचे कारवरील नियंत्रण सुटले.

त्या वेळी कार रस्ता सोडून जवळपास पंधरा फूट खाली जात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. सुदैवाने खड्डा खोल नसल्याने कारमधील पूनम अशोक धादलाणी, संगीता गणेश मोरे, कीर्ती देसाई, दीपेश भोसले, माई उतेकर आणि चालक किरण देसाई यांना कारमधून बाहेर पडता आले. या अपघातात कीर्ती देसाई, दीपेश भोसले आणि माई उतेकर (सर्व रा.बदलापूर) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी साई रग्णालय, पनवेल येथे हलविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car accident in Khalpur

फोटो गॅलरी