गाडी चालवताना हृदय विकाराचा झटका आल्याने कार चालकाचा मृत्यू

गाडी चालवताना हृदय विकाराचा झटका आल्याने कार चालकाचा मृत्यू

मुरबाड (ठाणे) - गाडी चालवताना हृदय विकाराचा झटका आल्याने एका कार चालकाचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी त्याने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्याने प्रवाशी सुखरूप राहिले. कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग  61 वर रविवार ता 2 सपटेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सरळगाव जवळ ही घटना घडली मृत चालकाचे नाव अब्दुल करिम मोहम्मद हुसेन शेख (वय 66) असुन तो अहमदनगर येथिल रहिवाशी आहे.  

कल्याण कडून श्रीरामपूर येथे किरण नामदेव माडी, अनिता किरण माडी व अनुजा अरविंद गिरमे त्यांच्या मुलीच्या घरी ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी निघाले असताना सरळगावाजवळ अचानक कारचालकाच्या छातीत दुखु लागले. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली तेथे जागीच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. मात्र प्रसगांवधान साधल्याने कार एका जागेवर थांबली यामुळे कार मधील तिघांचा जीव वाचला.  

मुरबाड ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातलगाच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मुरबाड- पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com