Crime News : कारची काच फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील त्रिकुट जेरबंद

रस्त्यालगत पार्क असलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप चोरणाऱया त्रिकुटाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.
Crime
CrimeSakal

नवी मुंबई - रस्त्यालगत पार्क असलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप चोरणाऱया त्रिकुटाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. सेनिथील दुरायरजन कुमार आर. डी (48), मुर्ती रामासामी चिन्नाफ्पन (30) व शिवा विश्वनाथन (47) अशी या त्रिकुटांची नावे असून हे चोरटे खास लॅपटॉप चोरण्यासाठी तामिळनाडु राज्यातील तिर्ची येथून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरट्यांनी नवी मुंबईसह इतर भागात केलेले 7 गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेले 10 लॅपटॉप पोलिसांनी जफ्त केले आहेत.

या चोरट्यांनी गत 10 जानेवारी रोजी सांयकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास वाशी सेक्टर-17 मधील विज्ञान सोसायटी समोरील रोडवर पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडून दोन्ही कारमधील दोन ऍपल कंपनीचे लॅपटॉप चोरुन पलायन केले होते.

त्यानंतर वाशी पोलिसांनी अमेय विचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, सदर चोरट्यांनी जे लॅपटॉप चोरले होते, त्यातील अमये विचारे यांचा लॅपटॉप त्यांच्या आय फोनशी कनेक्ट असल्याने विचारे यांना त्यांच्या आयफोनवर वारंवार सदर लॅपटॉपचे लोकेशन मिळत होते.

यावरुन सदर आरोपींचे लोकेशन सीएसएमटी परीसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर व पोलीस निरीक्षक संजय नाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, पवन नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे व त्यांच्या पथकाने तत्काळ रेल्वेने सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले.

यावेळी सदर चोरटे आपल्या मुळ गावी ट्रेनने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, वाशी पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलीसांच्या मदतीने लॅपटॉपच्या लोकेशनच्या आधारे तीन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले.

यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेले 10 लॅपटॉप सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेले लॅपटॉप जफ्त करुन त्यांना अटक करण्यात आली. सदर चोरट्यांकडे केलेल्या तपासादरम्यान ते तमिळनाडु राज्यातुन तिर्ची येथुन लॅपटॉप चोरण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले.

तसेच त्यांनी मागील 20 दिवसात संपुर्ण महाराष्ट्रभर फिरुन वाशी, नवघर, मुंलुंड, सी.बी.डी, नाशिक, पुणे, पंढरपुर या भागातून कारच्या काचा फोडून त्यातील 10 लॅपटॉप चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांनी विविध भागात केलेले 7 गुन्हे उघडकिस आले आहेत.

शशिकांत चांदेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाशी पोलीस ठाणे) -

या कारवाईत पकडण्यात आलेली टोळी सराईत असून त्यांनी महाराष्ट्र व मुंबई परिसरात केलेले 7 गुन्हे उघडकीस आले असले तरी या टोळीने संपुर्ण भारतभरात अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार या टोळीची अधिक चौकशी करण्यात येत आहे. सदर चोरटे चोरलेल्या या लॅपटॉपची तामिळनाडु राज्यात विल्हेवाट लावत असल्याचे देखील तपासात आढळुन आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com