सावधान! नवी मुंबईत डोक्यावर पडतायत वीजेचे खांब 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

नवी मुंबई : रस्त्यावरून फिरताना अथवा चालताना जर तुमच्या शेजारी विजेच्या दिव्याचा खांब असेल तर तो कधीही तुमच्या अंगावर कोसळू शकतो. अशी अवस्था सद्या शहरातील विजेच्या दिव्यांच्या खांबांची झाली आहे. शहरात रस्त्यांचे दुभाजक, पदपथ व उद्यानांमध्ये बसवण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांचे सिडकोकालीन खांब जूने झाल्यामुळे कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे.

हेही वाचा - एक वर्षाच्या मोहम्मदला घरबसल्या मिळाले 7 कोटी

नवी मुंबई : रस्त्यावरून फिरताना अथवा चालताना जर तुमच्या शेजारी विजेच्या दिव्याचा खांब असेल तर तो कधीही तुमच्या अंगावर कोसळू शकतो. अशी अवस्था सद्या शहरातील विजेच्या दिव्यांच्या खांबांची झाली आहे. शहरात रस्त्यांचे दुभाजक, पदपथ व उद्यानांमध्ये बसवण्यात आलेल्या विजेच्या दिव्यांचे सिडकोकालीन खांब जूने झाल्यामुळे कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे.

हेही वाचा - एक वर्षाच्या मोहम्मदला घरबसल्या मिळाले 7 कोटी

एका आठवड्यात खांब कोसळण्याच्या सलग दोन घटना घडल्या असून मागील पाच महिन्यात तब्बल 28 वेळा खांब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 
1980 च्या दशकात नवी मुंबई शहराच्या निर्मितीला सिडकोने सुरूवात केल्यामुळे शहरातील रस्ते, पदपथ व उद्यान तयार झाल्यावर सिडकोने त्याठिकाणी नागरीक व वाहनांच्या सोयीसाठी विजेच्या दिव्यांची व्यवस्था केली. बेलापूर पासून ते अगदी दिघ्यापर्यंत सिडकोतर्फे तब्बल 32 हजार विजेचे दिवे लावण्यात आले.

महत्त्वाची बातमी - मुंबई महापालिकेत 37 हजार जागा रिक्त

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर कालांतराने या दिवाबत्ती करण्याची व्यवस्था महापालिकेकडे आली. परंतू तेव्हा पासून आत्ता पर्यंत महापालिकेने या खाबांवर बंद पडलेले दिवे बदलण्याचे काम केले आहे. मात्र जूने झालेले खांब बदललेले नाहीत. शहरात रस्त्याच्या दुभाजकांवर, पदपथांच्या कडेला आणि उद्यानांमध्ये विजेची व्यवस्था करण्यासाठी हे खांब लावलेले दिसतात. हे खांब लोखंड धातूचे आहेत. बहुतांश सडलेले खांब हे दुभाजक व उद्यानातील आहेत.

दुभाजकांमध्ये शोभेच्या फुलझाडांना रोज पाणी द्यावे लागत असल्यामुळे हे खांब खालून गंजून खराब होत चालले आहेत. तसेच नवी मुंबई शहर खाडीच्या किनारी असल्याने आद्रतायुक्त हवेमुळे देखील लोखंडांच्या खांबांचे आयुर्मान कमी होत चालले आहे. अनेक खांब खालून सडत चालल्यामुळे वजनामुळे वाकून कोसळत आहेत. त्यामुळे शहरातील 18 हजार वीजेचे खांब बदलण्याची गरज असल्याचे अंदाज अभियांत्रिकी विभागातर्फे वर्तवण्यात येत आहे. 

अडीच हजार खांब बदलले 

शहरातील दिव्यांचे खांब गंजल्यामुळे तत्कालिन आयुक्त डॉ. रामास्वामी. एन यांच्या काळात सुमारे तीन कोटी रूपये खर्च करून अडीच हजार खांब बदलण्यात आले आहेत. सीबीडी-बेलापूर, नेरूळ, जूईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा या भागातील रस्ते, रेल्वे स्थानक व उद्यानांच्या भागातील काही खांब बदलून त्याजागेवर स्टीलचे खांब बसवण्यात आले आहेत. 

थोडक्‍यात बचावले 

गेल्या वर्षभरापासून शहरात विजेच्या दिव्यांचे खांब कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे. जानेवारी महिन्यात वाशी सेक्‍टर 29 येथे एका रिक्षावर खांब पडून रिक्षाचे नुकसान झाले. याच महिन्यात वाशी सेक्‍टर 29 मधील पंचशील सोसायटीसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या एका सायकलस्वाराच्या अंगावर खांब पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. 1 फेब्रुवारीला नेरूळच्या शनिमंदीर परिसरात पदपथावर खांब कोसळला. सुदैवाने त्याठिकाणी कोणी नसल्याने अनर्थ टळला. 3 फेब्रुवारीला नेरूळच्या पुनम टॉवर येथे रस्त्यावर खांब कोसळला. शहरात कोसळलेल्या घटनांमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका पार्सल घेऊन जाणाऱ्या मुलाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. 

web title : Careful! Electric poles while falling head over head in Navi Mumbai

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careful! Electric poles while falling head over head in Navi Mumbai