VIDEO :आजींच्या अंगावरून धडधडत गेली मालगाडी, आजी मात्र दोन पायांवर उभ्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

मुंबई - रेल्वे संदर्भातील सूचना कायम आपल्या कानावर पडत असतात. रेल्वेच्या दरवाजात उभं राहू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका, रेल्वेलाईन पासून दूर राहा. मात्र या घोषणांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. अनेक महाभाग तर मुद्दाम आपण किती दबंग आहोत हे दाखवण्यासाठी नसते उपदव्याप करत असतात. अशीच एक रेल्वे संदर्भातील धक्कादायक बातमी समोर येतेय. ही बातमी आहे एका आजींची. या आजींच्या अंगावरून संपूर्ण मालगाडी गेली, मात्र या आजींना साधं खरचटलं देखील नाही. काय आहे हा प्रकार , असं कसं झालं जाऊन घेऊयात.  

मोठी बातमी - मोबाईल फोन आणि नोटांमुळे पसरतो कोरोना, जाणून घ्या शास्त्रीय कारण...

देव तरी त्याला कोण मारी ही म्हण आपण सर्वानीच ऐकलीये. असाच काहीसा प्रकार लोणावळ्यात घडल्याचं बोललं जातंय. याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. अनेकदा गाड्या सायडिंगला उभ्या राहतात. अनेकदा यामध्ये मालगाड्या असतात. अनेक लोकं या मालगाडीच्या खालून रूळ क्रॉस देखील करतात. या व्हिडिओतील आजी देखील असंच काहीसं करायला गेल्यात आणि मालगाडी सुरु झाली. 

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

मालगाडी सुरू झालेली समजताच आजी थोड्या घाबरल्या मात्र आजींनी समयसूचकता दाखवली. आसपासच्या माणसांनी देखील आजींना रुळांवर सरळ झोपायला सांगितलं. पटकन रेल्वे रुळांवर झोपून आजींनी प्रसंगावधान दाखवलं. महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण मालगाडी या आजींच्या अंगावरून क्रॉस झाली मात्र, या आजींना साधं खरचटलं देखील नाही. संपूर्ण गाडी जाईपर्यंत या आजी अजून किती बाकी आहे असं विचारात होत्या.  

मालगाडी आजीबाईंच्या अंगावर जाणारा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ लोणावळ्यातील आहे असं म्हटलं जातंय. पण नेमकं कुठे घडलंय याची खात्रीशीर माहिती मिळु शकली नाही.

carriage train viral video of old lady of lonavala watch video

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: carriage train viral video of old lady of lonavala watch video