मोबाईल फोन आणि नोटांमुळे पसरतो कोरोना, जाणून घ्या शास्त्रीय कारण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

पैसे हाताळल्यावर हात धुण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला 

मुंबई - कोरोनाचा जगभरात प्रसार होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने जुन्या नोटांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. दाराच्या कड्या, स्वच्छतागृहांचे हॅण्डलप्रमाणेच नोटांवरही कोरोनाचे विषाणू असू शकतात, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

मोठी बातमी - कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

नोटा खूप मोठ्या प्रमाणावर हाताळल्या जातात, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ असते तसेच विषाणूही असतात, त्यामुळे त्याद्वारे प्रसार होण्याचा धोका जास्त असतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्‍त्यांनी सांगितल्याचे वृत्त "दी टेलिग्राफ'ने दिले आहे. त्यामुळे नोटा हाताळल्यावर लगेच हात धुवावे, त्याहीपेक्षा ते हात चेहऱ्यावर लावणे टाळावे असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी कॅशलेस पेमेंट करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बॅंक ऑफ इंग्लंडने ग्राहकांना नोटा हाताळल्यावर हात धुण्याचीही सूचना केली आहे. 

धक्कादायक ! २०२० मध्ये कोरोना येईल, १९८१ मध्येच एका पुस्तकात लिहिली होती कथा...

स्मार्टफोन स्वच्छ ठेवण्याची सूचना :

कोरोनापासून बचाव करण्यासाठी युरोपातील तज्ज्ञ स्मार्टफोन स्क्रीन दिवसातून दोनदा स्वच्छ ठेवण्याची सूचना करीत आहेत. स्मार्टफोनमध्ये ग्लास महत्त्वाची असते. ते विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते, असे वॉटर्लू विद्यापीठातील पीटर हॉल यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी दुपारी जेवण्यापूर्वी तसेच कार्यालयातून घरी आल्यावर स्मार्टफोनचा स्क्रीन स्वच्छ करण्याची सूचना केली. 

corona is being spread by mobile phone and currency bills read full story

कोरोना व्हायरस 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona is being spread by mobile phone and currency bills read full story