कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

कोरोनामुळे तब्ब्ल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव आणि घरच्यांचा बांध फुटला...

मुंबई - चीन वरून निघालेल्या मेलबर्न-बीजिंग-मुंबई विमान प्रवासात 24 जानेवारी रोजी अचानक मृत्यू झालेल्या एका भारतीय महिलेचा मृतदेह अखेरच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत पोचला.कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जागोजागी गंभीर निर्बंध आल्यानंतर त्यांच्या निधनानंतर 40 दिवसांनी त्यांचं अंत्यसंस्कार मुंबई येथे करण्यात येणार आहेत. 

वांद्रे येथे राहणाऱ्या रिटा मेहरा या आपला वांद्रे येथील दंतचिकित्सक मुलगा डॉ. पुनीत मेहरा यांच्यासह 24 जानेवारीला मेलबर्न-बीजिंग-मुंबई विमानाने प्रवास करत होत्या. विमानाने जवळपास नऊ तास प्रवास केल्यानंतर रिटा मेहरा या शौचालयात गेल्या परंतु तिथे त्या अचानक बेशुद्ध पडल्या.याची माहिती मिळताच पुनीत यांनी यांची माहिती फ्लाइट क्रूला दिली. 

रीटा मेहरा यांच्यावर प्रथोमोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ती अयशस्वी झाला. यानंतर विमानाने चीन मधील झेंझझो विमानतळावर आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले परंतु तोपर्यंत रिटा यांचा मृत्यू झाला होता. 

पुनीत मेहरा 7 फेब्रुवारीला मुंबईला परतले, त्यावेळी त्याच्या आईचा पार्थिव झेंग्झो रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले होते.याच दरम्यान प्राणघातक कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर चीनमध्ये देशांतर्गत प्रवास करण्यावरील कडक निर्बंध घालण्यात आले. यामुळे रिटा यांचा मृतदेह तिथेच अडकून पडला. अंत्यसंस्कारासाठी पुनीत यांनी रिटा यांचा मृतदेह मुंबईत आणण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. 

रिटा यांच्या मृत्यूनंतर 40 दिवसांनी रिटा यांचा शव बिजिंग विमानतळावरील कार्गो एजंटच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी दुपारी शव बीजिंग ते अबू धाबी आणि नंतर मुंबईकमध्ये आणण्यात आले. रिटा यांच्यावर बुधवारी संताक्रूज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

due to corona chaos body of reeta mehara arrived after forty long days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com