मुंबईत गोवंशाचा मृत्यू झाल्यास गोशाळा मालकास नोंदणी बंधनकारक; महापालिकेचाच निर्णय

समीर सुर्वे
Wednesday, 11 November 2020

मुंबईत गाय किंवा बैलाच्या मृत्यू झाल्यास गोशाळा तसेच तबेला मालकाला त्या संबंधीत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अशी माहिती महानगर पालिकेने बाजार व उद्यान समितीत सादर केली आहे.

मुंबई : मुंबईत गाय किंवा बैलाच्या मृत्यू झाल्यास गोशाळा तसेच तबेला मालकाला त्या संबंधीत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अशी माहिती महानगर पालिकेने बाजार व उद्यान समितीत सादर केली आहे.

'बिहार निकालांचा आकस न ठेवता, राज्यात छटपूजेला संमती द्या'; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य सरकारने 2015 मध्ये गोवंश हत्या बंदीचा कायदा केला आहे.त्यानंतर 2019 मध्ये भाजपचे राम बारोट यांनी ठराविची सुचना मांडून मुंबईत गाय वर्गिय प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद महानगर पालिकेकडे करणे बंधनकारक करावे.जेणेकरुन गायींची अचूक नोंद ठेवता येईल.त्याच बरोबर गायींना विशिष्ट नोंदणी क्रमांक देऊन वय, उंची, शिंग तसेच शरीरावरील विशेष खुण यांची नोंद ठेवावी. जेणेकरुन गायींची नोंद ठेवणे महापालिकेला सोप्पे होईल.असे या ठरावात नमुद होते.
या ठरावावर महानगर पालिकेने बाजार व उद्यान समितीत अहवाल सादर केला आहे.गायींची नोंद ठेवणे हे राज्य सरकारच्या पशुसंवंर्धन विभागाच्या अखत्यारीतील काम आहे.तर,मुंबईतील गायवर्गिय प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्या संबंधीची माहिती महानगर पालिकेला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यंदा फटाक्यांवर संक्रांत, मश्जिद बंदरमधली फटाक्यांची दुकाने रिकामीच

2019 च्या पशुगणनेनुसार मुंबईत 3 हजार 226 गायवर्गिय प्राणी आहेत.मुंबईतील तबेल्यांमध्ये गायींचे प्रमाण कमी आहे.मात्र,गोशाळांमध्ये गायी तुलनेने जास्त प्रमाणात आहेत.

In case of death of a cow in Mumbai registration is mandatory for the owner of the cowshed Municipal Corporation decision

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In case of death of a cow in Mumbai registration is mandatory for the owner of the cowshed Municipal Corporation decision