esakal | ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह दोघांवर गुन्हा दाखल; कोव्हिडसंदर्भातील महत्वाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी मोठी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह दोघांवर गुन्हा दाखल; कोव्हिडसंदर्भातील महत्वाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी मोठी कारवाई

कोव्हिडसंबंधित महत्त्वाच्या फाईल गायब प्रकरणात अखेर तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्यासह खासगी व्यक्ती फिरोज खान या दोघांवर अखेर शीळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह दोघांवर गुन्हा दाखल; कोव्हिडसंदर्भातील महत्वाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी मोठी कारवाई

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयातून संगणक आणि कोव्हिडसंबंधित महत्त्वाच्या फाईल गायब प्रकरणात अखेर तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्यासह खासगी व्यक्ती फिरोज खान या दोघांवर अखेर शीळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने  दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती शीळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

मुंबईत कोरोनाचे थैमान थांबेना! गेल्या 24 तासात 2 हजारापेक्षा अधिक रुग्णांची भर; तर 44 जणांचा मृत्यू

 ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाईल चोरीला गेल्या होत्या. यावेळी दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ सुनील मोरे आल्याची नोंद सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आली होती. 17 ऑगस्टला संध्याकाळी उशिरा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली होती. यामध्ये मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली. तर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली आली.

मात्र ज्या दिवशी या बदल्या झाल्या त्याच रात्री उशिरा दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणि काही महत्त्वाच्या फाईल चोरीला गेल्या होत्या. पालिका मुख्यालयातून दोन संगणक दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांनी मागवले होते. प्रभाग समितीच्या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार आणि कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार 17 ऑगस्टला सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर त्याच रात्री 8:46 वाजता मोरे पुन्हा दिवा प्रभाग समिती कार्यालयात आल्याची नोंद करण्यात आली होती. 

कौतुकास्पद! कोरोनाकाळात 1 हजार 600 कर्करूग्णांवर टाटा रुग्णालयात शस्त्रक्रिया; उपचाराचा वेग वाढवला

प्रशासनाकडून सुरुवातीला चौकशीच!
संगणक आणि फाईल गहाळ प्रकरणात यापूर्वीच अहवाल तयार करण्यात आला असून तो कार्मिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपायुक्त मुख्यालय यांना पाठवण्यात होता. मात्र, प्रभाग समितीमधील संगणक आणि आणि महत्त्वाच्या फाईल आदी सरकारी मालमत्ता चोरीला जाऊनही प्रशासनाकडून केवळ पालिका स्तरावरच चौकशी करण्यात येत होती. मात्र, आता प्रकरणाची गंभीर दखल आयुक्तांच्या स्तरावर घेतल्याने अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top